मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  वीकेंडला करताय पावभाजीचा प्लॅन? बनवा रेस्टॉरंट स्टाईल भाजी

वीकेंडला करताय पावभाजीचा प्लॅन? बनवा रेस्टॉरंट स्टाईल भाजी

Hiral Shriram Gawande HT Marathi
Aug 12, 2022 07:26 PM IST

सुट्टीच्या दिवशी पूर्ण स्वयंपाक करायचा कंटाळा आला असेल तर पावभाजी बेस्ट ऑप्शन आहे. रेस्टॉरंट स्टाईल भाजी बनवण्यासाठी पहा ही रेसिपी.

पावभाजी
पावभाजी

जर तुम्हाला इंडियन स्ट्रीट फूड आवडत असेल तर तुम्ही ही सोपी पावभाजी रेसिपी नक्कीच ट्राय केली पाहिजे. मसाले, बटर आणि मॅश केलेल्या भाज्या यांचे स्वादिष्ट मिश्रण, तुम्हाला ते आवडेल. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ही पावभाजी फक्त एका तासात बनवता येते. त्यामुळे तुमच्याकडे कमी वेळ असला तरी तुम्ही ते सहज बनवू शकता. या सोप्या रेसिपीमुळे, पावभाजी ऑनलाइन ऑर्डर करण्याची गरज पडणार नाही. वीकेंडला तुम्ही बाहेरून पावभाजी ऑर्डर करण्याचा विचार करत असाल, ते स्किप करा आणि घरीच रेस्टॉरंट स्टाईल भाजी बनवा. तुम्ही हे लंच किंवा डिनरसाठी देखील बनवू शकता. चला तर मग जाणून घ्या कशी बनवायची भाजी.

भाजी बनवण्यासाठी आवश्यक साहित्य

- ४ मध्यम बटाटे (उकळून मॅश केलेले)

- २ मध्यम कांदे (चिरलेले)

- १/२ वाटी फ्लॉवर (चिरलेले)

- १ कप वाटाणे

- ४ मध्यम टोमॅटो (चिरलेले)

- १ सिमला मिरची (बिया काढून बारीक चिरलेली)

- १/४ कप गाजर (चिरलेले)

- २ चमचे लसूण पेस्ट

- १/२ टीस्पून आले पेस्ट

- १/४ वाटी हिरवे बीन्स

- २ हिरव्या मिरच्या (चिरलेले)

- २५ ग्रॅम वितळलेले बटर

- २ चमचे पाव भाजी मसाला

- १ मध्यम लिंबू

- ३ टेबलस्पून रिफाइंड तेल

- आवश्यकतेनुसार मीठ

- ८ पाव

 

भाजी बनवण्याची पद्धत

पावभाजीची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम वाटाणे, फुलकोबी, गाजर आणि बीन्स प्रेशर कुकरमध्ये थोडे पाणी घालून उकळू घ्या. तुम्हाला बीन्स आणि गाजर नको असतील तर तुम्ही ते स्किप देखील करू शकता. हे सर्व शिजल्यानंतर चांगले मॅश करा. आता एका कढईत तेल गरम करून त्यात तीन चतुर्थांश कांदा घाला. हलके सोनेरी होईपर्यंत शिजवा. नंतर त्यात हिरवी मिरची आणि आले-लसूण पेस्ट घाला. तुम्हाला भाजी जास्त तिखट नको असेल तर तुम्ही हिरवी मिरची स्किप करू शकता. साधारण अर्धा मिनिट परतून घ्या आणि नंतर पावभाजी मसाला आणि चिरलेली सिमला मिरची घालून एक मिनिट परतून घ्या. लक्षात ठेवा तुम्ही टोमॅटो बारीक चिरले आहेत. टोमॅटो, मीठ घालून मध्यम आचेवर तीन ते चार मिनिटे शिजवा. सतत ढवळत राहा किंवा मसाल्यापासून तेल वेगळे होईपर्यंत ३ ते ४ मिनिटे शिजवा. नंतर मॅश केलेले वाटाणे, फ्लॉवर, बटाटे आणि २ कप पाणी घाला. उकळी आणा आणि दहा मिनिटे शिजवा. चमच्याच्या मागील बाजूने काही वेळा दाबून सर्व भाज्या पूर्णपणे मॅश होईपर्यंत उकळवा आणि एकत्र मिक्स करा. आता एका बाजूला जाड तळाच्या पॅनमध्ये किंवा तव्यावर थोडे बटर गरम करा. पावाचे दोन भाग करा आणि बटरमध्ये अर्धा मिनिट दोन किंवा तीन वेळा दाबून किंवा पाव कुरकुरीत आणि हलका ब्राऊन होईपर्यंत भाजा. भाजी वर तेल सुटले असेल तर तुमची भाजी रेडी झाली आहे. आता कोथिंबीरने गार्निश करा. सर्व्ह करताना थोडेसे बटर टाका. भाजीसोबत बारीक चिरलेला कांदा आणि लिंबू सर्व्ह करायला विसरू नका.

 

WhatsApp channel

विभाग