Restaurant Style Gravy Recipe: रेस्टॉरंट किंवा ढाब्याचे जेवण सर्वांनाच आवडते. घरी जेवायची इच्छा नसेल किंवा चेंज हवा असेल तर तेव्हा बाहेरून जेवण मागवले जाते. बऱ्याचदा हे अन्न जास्तीत जास्त ३० मिनिटांत तयार करून तुम्हाला दिले जाते. पण तीच भाजी घरी तयार केली तर तयार व्हायला तास लागतो. वास्तविक, रेस्टॉरंटमधून अन्न पटकन येते कारण तेथे भाजी बनवण्याची ग्रेव्ही तयार असते आणि ते पुन्हा तडका दिला जातो, गार्निश केले जाते आणि नंतर सर्व्ह करतात. तुम्हालाही घरच्या घरी रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही बनवायची असेल तर बघा कशी बनवायची-
- ४ मोठे कांदे
- ५-६ मोठे लाल टोमॅटो
- २ इंच आले
- ६-८ हिरव्या मिरच्या
- कोथिंबीर
- अर्धा टीस्पून लाल तिखट
- अर्धा टीस्पून हळद
- अर्धा टीस्पून गरम मसाला
- अर्धा टीस्पून जिरे पावडर
- एक चिमूटभर हिंग
- १ टीस्पून ओवा
- १ टेबलस्पून धने
- १ टीस्पून जिरे
- २ दालचिनीच्या काड्या
- २-३ तमालपत्र
- ५-६ हिरव्या वेलची
- ७-८ लवंग
- १२-१५ काजू
- १ टीस्पून मीठ
- अर्धा कप तेल
ग्रेव्ही बनवण्यासाठी प्रथम कांदा सोलून बारीक चिरून घ्या. यासोबत टोमॅटोही धुवून कापून घ्या. आता एका कढईत थोडे तेल गरम करून त्यात कांदा टाका. हलकेच भाजून घ्या. नंतर त्यात धने आणि काजू घालून मिक्स करा. नंतर त्यात टोमॅटो घाला. टोमॅटो घातल्यावर त्यात मीठ घालून १-२ मिनिटे शिजू द्या. नंतर त्यात हिरवी मिरची आणि आले घालावे. आता त्यात कोथिंबीर त्याच्या देठासह घाला. नीट मिक्स करून घ्या आणि नंतर गॅस बंद करून थंड होऊ द्या. थंड झाल्यावर बारीक करून घ्या. आता पॅनमध्ये पुन्हा तेल गरम करा आणि त्यात २ दालचिनीच्या काड्या, २-३ तमालपत्र, ५-६ हिरव्या वेलची आणि ७-८ लवंगा घाला. नंतर त्यात सर्व मसाले आणि थोडे पाणी घाला. मसाले नीट शिजल्यानंतर त्यात ब्लेंड केलेली ग्रेव्ही घाला. चांगले शिजल्यानंतर गॅस बंद करा. हे पूर्णपणे थंड झाल्यावर ते साठवा.
आता तुम्ही या ग्रेव्हीमध्ये पनीर, बटाटा, चाप यांसारख्या गोष्टी घालून चविष्ट भाजी बनवू शकता. चांगल्या चवीसाठी भाजी मसाला वापरा, जसे की तुम्ही शाही पनीर बनवत असाल तर ग्रेव्हीमध्ये पनीर टाकताना थोडे शाही पनीर मसाला टाकल्याने भाजीची चव वाढेल.
संबंधित बातम्या