मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Fried Rice: घरी झटपट बनवा रेस्टॉरंट स्टाईल फ्राईड राईस, डिनरसाठी परफेक्ट आहे ही रेसिपी

Fried Rice: घरी झटपट बनवा रेस्टॉरंट स्टाईल फ्राईड राईस, डिनरसाठी परफेक्ट आहे ही रेसिपी

Hiral Shriram Gawande HT Marathi
Feb 28, 2024 08:15 PM IST

Dinner Recipe: रात्रीच्या जेवणात काहीतरी हलकं फुलकं आणि टेस्टी खायचं असेल तर तुम्ही झटपट फ्राईड राईस बनवू शकता. जाणून घ्या रेसिपी.

रेस्टॉरंट स्टाईल फ्राईड राईस
रेस्टॉरंट स्टाईल फ्राईड राईस (unsplash)

Restaurant Style Fried Rice Recipe: लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना फ्राईड राईस खायला आवडते. प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारे फ्राईड राइस बनवतो. पण अनेक वेळा महिला तक्रार करतात की रेस्टॉरंट सारखे फ्राईड राईस घरी बनत नाही. तुम्हाला सुद्धा हा अनुभव असेल तर आता काळजी करू नका. ही रेसिपी फॉलो करून तुम्ही रेस्टॉरंट सारखे फ्राईड राईस घरी बनवू शकता. चला तर मग जाणून घ्या रेस्टॉरंट स्टाईल फ्राईड राईसची रेसिपी.

फ्राईड राईस बनवण्यासाठी साहित्य

- १ कप शिजवलेला भात

- २ हिरवे कांदे

- १ कांदा

- १ शिमला मिरची

- १ गाजर

- १ कप बारीक चिरलेली कोबी

- लसूण

- २ चमचे सोया सॉस

- २ चमचे व्हिनेगर

- ४ काळी मिरी

- १ चमचा पांढरे मिरीची पावडर

- २ टेबलस्पून तेल

- चवीनुसार मीठ

फ्राईड राईस बनवण्याची पद्धत

रेस्टॉरंट स्टाईल फ्राईड राईस बनवण्यासाठी सर्वप्रथम सर्व भाज्या बारीक चिरून घ्या. नंतर कढईत तेल गरम करून त्यात लसूण, कांदा टाकून मंद आचेवर परता. त्यानंतर सर्व भाज्या घाला आणि एक मिनिट शिजवा. नंतर त्यात सोया सॉस, मीठ, पांढरे मिरीची पावडर घालून मिक्स करा. आता शिजवलेला भात घालून सर्व नीट मिक्स करा. हे मिक्स करताना हलक्या हाताने मिसळा. तुमचा फ्राईड राईस तयार आहे. गरमा गरम सर्व्ह करा.

WhatsApp channel