मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Cold Coffee: घरी तयार करा रेस्टॉरंटसारखी क्रीमी कोल्ड कॉफी, रिफ्रेश आणि कूल करेल ही रेसिपी

Cold Coffee: घरी तयार करा रेस्टॉरंटसारखी क्रीमी कोल्ड कॉफी, रिफ्रेश आणि कूल करेल ही रेसिपी

Jun 25, 2024 07:30 PM IST

Creamy Cold Coffee Recipe: कोल्ड कॉफीची ही रेसिपी फॉलो करून तुम्ही मिनिटात स्वतःला रिफ्रेश करू शकता. जाणून घ्या घरी रेस्टॉरंटसारखी क्रीमी कोल्ड कॉफी कशी बनवायची.

रेस्टॉरंटसारखी क्रीमी कोल्ड कॉफी
रेस्टॉरंटसारखी क्रीमी कोल्ड कॉफी (unsplash)

Restaurant Style Creamy Cold Coffee Recipe: उन्हाळ्यात स्वत:ला हायड्रेटेड आणि थंड ठेवण्यासाठी आहारात ताक, लस्सी, कैरीचं पन्हं यासारख्या गोष्टींचा समावेश करण्यास सुरवात करतात. पण जर तुम्ही कॉफी प्रेमी असाल आणि गरमीमध्ये सुद्धा कॉफी प्यायची असेल तर रेस्टॉरंटसारखी इन्स्टंट क्रीमी कोल्ड कॉफी बनवा. उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारी आणि मनाला रिफ्रेश करणारी ही रेसिपी आहे. जर तुम्हालाही असं वाटत असेल की तुम्ही बाजारात मिळणारी क्रीमी कोल्ड कॉफी घरी बनवू शकत नाही तर ही रेसिपी तुमची समस्या सोपी करेल. कोल्ड कॉफीची ही रेसिपी फॉलो करून तुम्ही मिनिटात स्वतःला रिफ्रेश करू शकता. चला तर मग जाणून घेऊया रेस्टॉरंटसारखी क्रीमी कोल्ड कॉफी कशी बनवायची.

रेस्टॉरंटसारखी क्रीमी कोल्ड कॉफी बनवण्यासाठी साहित्य

- कॉफी पावडर - एक चमचा

ट्रेंडिंग न्यूज

- दूध - दीड कप

- गरम पाणी

- साखर - चवीनुसार

- आईस क्यूब्स - ४-५

- चॉकलेट सिरप

रेस्टॉरंटसारखी क्रीमी कोल्ड कॉफी बनवण्याची पद्धत 

रेस्टॉरंटसारखी क्रीमी कोल्ड कॉफी बनवण्यासाठी सर्वप्रथम कॉफी गरम पाण्यात फेटून घ्या आणि ब्लेंडर जारमध्ये ठेवा. आता ब्लेंडरमध्ये दूध, साखर आणि आईस क्यूब घालून त्यात फोम तयार होईपर्यंत ब्लेंड करा. आता एक ग्लास घ्या आणि त्यात चॉकलेट सिरप घाला. हे सिरप काचेच्या पृष्ठभागावर पडेल अशा प्रकारे घाला. अशा प्रकारे टाकलेले सिरप ग्लासमध्ये चांगले वाटते. आता ब्लेंडरमधून कॉफी ग्लासमध्ये टाका. चॉकलेट पावडर, व्हिप्ड क्रीम किंवा आईस्क्रीमने सजवलेली कॉफी सर्व्ह करा.

टिप्स

कॉफी बनवताना अनेकदा जेव्हा त्यात शेवटी बर्फाचे तुकडे घातले जातात तेव्हा कॉफी पाण्यासारखी पातळ आणि फिकट दिसू लागते. ही समस्या टाळण्यासाठी तुम्ही साखर आणि कॉफी मिसळून कॉफी तयार करा. त्यानंतर कॉफीमध्ये बर्फाचे तुकडे घाला. कॉफीची मजा द्विगुणित होईल.

WhatsApp channel