Rawa Kachori Recipe: नाश्त्यात बनवा रवा कचोरी! बघा रेसिपीचा Video
Breakfast Recipe: रवा कचोरीची रेसिपी खूप सोपी आहे. ही डिश तुम्ही सकाळ किंवा संध्यकाळच्या नाश्त्यात खाऊ शकता.
Tea Time snacks recipe: तुम्ही रव्यापासून बनवलेल्या अनेक पदार्थांचा आस्वाद घेतला असेल, पण तुम्ही कधी रवा कचोरी रेसिपी करून पाहिली आहे का? जर नसेल तर यावेळी तुम्ही नाश्त्यात रवा कचोरीची रेसिपी करून सगळ्यांकडून प्रशंसा मिळवून घेऊ शकता. रवा कचोरी बनवण्याची रेसिपी जी इंस्टाग्राम यूजरने @home_food_space_ ने त्याच्या अकाउंटवर शेअर केली आहे. चला तर मग जाणून घेऊया रवा कचोरीची रेसिपी...
ट्रेंडिंग न्यूज
लागणारे साहित्य
एक वाटी रवा, एक ग्लास पाणी, अर्धा चमचा चिली फ्लेक्स, दोन उकडलेले बटाटे, एक शिमला मिरची, एक गाजर, कोथिंबीर, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, आवश्यक तेल आणि मीठ चवीनुसार घ्या.
Mango Peda Recipe: उन्हाळ्यात बनवा आंब्याचे पेढे! नोट करा सोपी रेसिपी
रवा कचोरी बनवण्याची पद्धत
रवा कचोरी बनवण्यासाठी प्रथम सर्व भाज्या नीट धुवून बारीक चिरून घ्या. आता एका कढईत पाणी गरम करून त्यात चिली फ्लेक्स टाका, नंतर दोन चमचे तेल घाला. यानंतर पाण्यात मीठ आणि रवा टाका. नंतर सर्व पाणी सुटेपर्यंत रवा ढवळत राहा. आता हे रव्याचे पीठ करून बाजूला ठेवा.
Cheese Tomato Sandwich Recipe: नाश्त्यात बनवा चविष्ट चीज टोमॅटो सँडविच! जाणून घ्या रेसिपी
यानंतर उकडलेले बटाटे मॅश करून त्यात चिरलेली सिमला मिरची, गाजर, कोथिंबीर, मीठ, लाल तिखट, धनेपूड, जिरेपूड घालून चांगले मिक्स करून सारण तयार करा. नंतर रव्याच्या पिठाचा मोठा गोळा घेऊन त्यात एक चमचा सारण भरून कचोरीचा आकार द्या. आता कढईत तेल गरम करून त्यात कचोऱ्या तळून घ्या. तुमची गरमागरम रवा कचोरी तयार आहे. तुम्ही त्यांना चटणी किंवा सॉससोबत सर्व्ह करू शकता.