मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Rajma Chaat Recipe: झटपट बनवा राजमा चाट, हाडे मजबूत करण्यासाठी आहे फायदेशीर!
Healthy Breakfast
Healthy Breakfast (Freepik )

Rajma Chaat Recipe: झटपट बनवा राजमा चाट, हाडे मजबूत करण्यासाठी आहे फायदेशीर!

25 May 2023, 15:15 ISTTejashree Tanaji Gaikwad

Health Care: वजन कमी करण्यापासून ते हाडे मजबूत करण्यासाठी राजमा चाट उत्तम आहे.

Rajma Chaat Recipe: आपण नेहमी राजमाची भाजीच खातो. पण तुम्हाला माहितेय का की राजमापासून आपण वेगवगेळे पदार्थ बनवू शकता. राजमापासून तयार केले चाट आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जर तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत सतर्क असाल, तर तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात चवदार आणि आरोग्यदायी राजमा चाटने करू शकता. राजमा चाट खाल्ल्याने हाडे मजबूत होण्यास मदत होते. यासोबतच फायबर युक्त राजमा खाल्ल्यानंतर दीर्घकाळ भूक लागत नाही, जे वजन कमी करण्यातही उपयुक्त ठरू शकते. नाश्त्यात राजमा चाट खाणे हा एक चांगला पर्याय असू शकतो. बनवायला खूप सोपे आहे आणि राजमा चाट काही मिनिटात तयार होते. तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये पोषणयुक्त राजमा चाट देखील पाठवू शकता. चला जाणून घेऊया राजमा चाट बनवण्याची सोपी पद्धत.

ट्रेंडिंग न्यूज

राजमा चाट बनवण्यासाठी साहित्य

राजमा उकडलेले - २ कप

उकडलेले बटाटे - २-३

उकडलेले चणे - १/२ कप

कांदा - २

हिरवी मिरची चिरलेली - २-३

टोमॅटो - १

हिरवी कोथिंबीर चिरलेली - १/२ कप

लिंबू - १

चाट मसाला - १ टीस्पून

काळी मिरी पावडर - १ टीस्पून

काळे मीठ - १ टीस्पून

मीठ - चवीनुसार

राजमा चाट कसा बनवायचा?

राजमा चाट बनवण्यासाठी प्रथम राजमा आणि चणे स्वच्छ करून रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी कुकरमध्ये राजमा, छोले आणि बटाटे घालून ४-५ शिट्ट्या उकळा. दरम्यान, कांदा आणि टोमॅटोचे बारीक तुकडे करा. कुकर थंड झाल्यावर एका भांड्यात राजमा, चणे काढा आणि बटाटे सोलून त्यांचेही छोटे तुकडे करा. आता एका मोठ्या भांड्यात उकडलेले राजमा, चणे आणि बटाट्याचे तुकडे ठेवा आणि तिन्ही चांगले मिक्स करा. यानंतर चाटमध्ये बारीक चिरलेला टोमॅटो आणि कांदे घालून मिक्स करा. सर्व काही नीट मिसळल्यानंतर त्यात चिरलेल्या हिरव्या मिरच्या घाला. नंतर चवीनुसार चाटम मसाला, काळे मीठ आणि साधे मीठ एकत्र करा. आता राजमा चाटमध्ये आवश्यकतेनुसार लिंबाचा रस घाला आणि मिक्स करा.

एक मिनिट सर्वकाही नीट मिक्स केल्यानंतर, शेवटी राजमा चाटमध्ये हिरवी कोथिंबीर घाला आणि मिक्स करा. चव आणि पौष्टिकतेने परिपूर्ण राजमा चाट तयार आहे. हे नाश्त्यात किंवा दिवसा कोणत्याही वेळी खाऊ शकता.

विभाग