Rajgira Sheera: आषाढी एकादशीला नैवेद्यासाठी बनवा राजगिऱ्याचा शिरा, उपवासासाठी बेस्ट आहे रेसिपी
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Rajgira Sheera: आषाढी एकादशीला नैवेद्यासाठी बनवा राजगिऱ्याचा शिरा, उपवासासाठी बेस्ट आहे रेसिपी

Rajgira Sheera: आषाढी एकादशीला नैवेद्यासाठी बनवा राजगिऱ्याचा शिरा, उपवासासाठी बेस्ट आहे रेसिपी

Published Jul 16, 2024 07:05 PM IST

Ashadhi Ekadhashi Vrat Recipe: आषाढी एकादशीला तुम्हाला प्रश्न पडला असेल की प्रसादासाठी काय बनवावे जे उपवासालाही चालेल तर ही रेसिपी ट्राय करा. तुम्ही कमी वेळेत राजगिऱ्याचा शिरा बनवू शकता.

राजगिऱ्याचा शिरा
राजगिऱ्याचा शिरा

Rajgira Sheera Recipe: आषाढी एकादशीला पांडूरंगाची पूजा केली जाते. अनेक जण घरी माऊलीला नैवेद्याला विविध पदार्थ बनवतात. या दिवशी बहुतांश लोक उपवास देखील करतात. तुम्ही सुद्धा उपवास करत असाल आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की नैवेद्यासाठी काय बनवावे जे उपवासासाठी देखील चालेल. तर आता काळजी करू नका. तुम्ही ही रेसिपी फॉलो करून अगदी कमी वेळेत राजगिऱ्याचा शिरा बनवू शकता. हा शिरा तुम्ही देवाला नैवेद्याला देखील अर्पण करू शकता तसेच उपवासासाठी देखील खाता येतो. चला तर मग जाणून घ्या कसा बनवायचा राजगिऱ्याचा शिरा.

 

राजगिऱ्याचा शीरा बनवण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे -

- राजगिरा पीठ

- तूप

- साखर

- दूध

- मनुका

- ड्राय फ्रूट्स

- वेलची पावडर

राजगिऱ्याचा शिरा बनवण्याची पद्धत

उपवासाला राजगिऱ्याचा शिरा बनवण्यासाठी प्रथम दूध चांगले उकळून घ्या. आता एका कढईत तूप गरम करा. तूप गरम झाल्यावर त्यात राजगिरा पीठ घालून चांगले भाजून घ्या. लक्षात ठेवा हे पीठ भाजायला जास्त वेळ लागत नाही. अवघ्या ७ ते १० मिनिटांत त्यातून सुगंध येऊ लागतो. राजगिऱ्याचे पीठ भाजताना गॅस मंद आचेवर ठेवायची काळजी घ्या. नाहीतर पीठ जळू शकते. पीठ भाजल्यावर त्यात उकळलेले दूध घाला. दूध घालताना नीट ढवळत राहा. ४ ते ५ मिनिटांनी त्यात साखर घाला. आता ते विरघळू द्या. नंतर त्यात मनुका आणि तुमच्या आवडीचे ड्राय फ्रूट्स घाला. 

शेवटी वेलची पावडर घालून मिक्स करा. तुमचा राजगिऱ्याचा शिरा तयार आहे. पांडूरंगाला प्रसाद म्हणून अर्पण करा आणि उपवासाला आस्वाद घ्या.

Whats_app_banner