Bajra Khichdi: डिनरमध्ये खायचंय काही हलकं? बनवा राजस्थानी बाजरा खिचडीची ही रेसिपी
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Bajra Khichdi: डिनरमध्ये खायचंय काही हलकं? बनवा राजस्थानी बाजरा खिचडीची ही रेसिपी

Bajra Khichdi: डिनरमध्ये खायचंय काही हलकं? बनवा राजस्थानी बाजरा खिचडीची ही रेसिपी

Jan 23, 2024 08:04 PM IST

Recipe for Dinner: रात्रीच्या जेवणात काहीतरी हलके खाण्याची इच्छा असेल तर नेहमी खिचडी न बनवता राजस्थानी बाजरा खिचडीची ही रेसिपी ट्राय करा.

राजस्थानी बाजरा खिचडी
राजस्थानी बाजरा खिचडी

Rajasthani Bajra Khichdi Recipe: अनेक लोकांना रात्रीच्या जेवणात खिचडी खायला आवडते. दाल खिचडी, खिचडी कढी, मसाला खिचडी अशा विविध प्रकारची खिचडी तुम्ही नेहमीच खाल्ली असेल. रात्रीच्या जेवणात काहीतरी हलके खावेसे वाटत असेल पण नेहमीची खिचडी खाण्याचा कंटाळा आला असेल तर तुम्ही राजस्थानी बाजरा खिचडीची ही रेसिपी ट्राय करू शकता. ही खिचडी फक्त खायला टेस्टी नाही तर आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर आहे. थंडीच्या दिवसात बाजरा खाणे चांगले म्हटले जाते. चला तर मग जाणून घ्या कशी बनवायची राजस्थानी बाजरा खिचडी.

राजस्थानी बाजरा खिचडी बनवण्यासाठी साहित्य

- १/२ कप बाजरी (आठ तास पाण्यात भिजवलेली)

- १/२ कप पिवळी मूग डाळ

- १ चमचा तूप

- १ चमचा जिरे

- १/२ चमचा हिंग

- १/४ चमचा हळद

- मीठ चवीनुसार

राजस्थानी बाजरा खिचडी बनवण्याची पद्धत

ही खिचडी बनण्यासाठी प्रथम बाजरी पाण्यातून काढून नीट धुवा. मूग डाळही चांगली धुवून घ्या. आता कुकरमध्ये बाजरी, मूग डाळ, मीठ आणि दोन वाट्या पाणी घालून मध्यम आचेवर चार ते पाच शिट्ट्या होईपर्यंत शिजवा. कुकरचा प्रेशर स्वतःच निघू द्या. आता एका खोल नॉनस्टिक पॅनमध्ये तूप गरम करून त्यात जिरे टाका. ते तडतडायला लागल्यावर हिंग आणि हळद घालून काही सेकंद परतून घ्या. कढईत शिजवलेले बाजरी आणि मूग डाळ यांचे मिश्रण घालून मिक्स करा. आता त्यात चवीनुसार मीठ मिक्स करा. मध्यम आचेवर चार ते पाच मिनिटे शिजवा. तुमची राजस्थानी बाजरा खिचडी तयार आहे. गरमागरम सर्व्ह करा.

Whats_app_banner