Raj Kachori: संध्याकाळच्या नाश्त्यात बनवा टेस्टी राज कचोरी, बनवण्यासाठी नोट करा रेसिपी
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Raj Kachori: संध्याकाळच्या नाश्त्यात बनवा टेस्टी राज कचोरी, बनवण्यासाठी नोट करा रेसिपी

Raj Kachori: संध्याकाळच्या नाश्त्यात बनवा टेस्टी राज कचोरी, बनवण्यासाठी नोट करा रेसिपी

May 09, 2024 05:40 PM IST

recipe, recipe in marathi, snacks recipe, evening snacks recipe, raj kachori, raj kachori recipe, how to make raj kachori, राज कचोरी, राज कचोरी कशी बनवायची, राज कचोरीची रेसिपी, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी रेसिपी,

राज कचोरी बनवण्यासाठी रेसिपी
राज कचोरी बनवण्यासाठी रेसिपी (freepik)

Raj Kachori Recipe: संध्याकाळची भूक भागवण्यासाठी वेगवेगळे स्नॅक्स खाल्ले जातात. त्यातही लोकांना कचोरी, समोसा सारखेव प्रकार खायला जास्त आवडतात. उन्हाळ्याच्या दिवसात चाटचे प्रकार मोठ्या चवीने खाल्ले जातात. तुम्हाला सुद्धा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी काय बनवावे हे कळत नसेल तर तुम्ही राज कचोरीची ही रेसिपी ट्राय करू शकता. ही रेसिपी तुमची चटपटीत खायची इच्छा पूर्ण करेल. ही कचोरी खायला टेस्टी आणि बनवयाला सोपी आहे. चला तर मग जाणून घ्या कशी बनवायची राज कचोरी.

राज कचोरी बनवण्यासाठी साहित्य

- मैदा - २ कप

- बेसन - २/३ कप

- धुतलेली उडदाची डाळ - १/२ कप

- धुतलेली मूग डाळ - १/८ कप

- तेल - २ चमचे

- तूप - २ चमचे

- आमचूर पावडर - २ चमचे

- मीठ - चवीनुसार

- तेल तळण्यासाठी

- हिरवी मिरची १

- आले १ तुकडा

- मीठ चवीनुसार

- दही ३ कप

- उकडलेले बटाटे २

- काळे हरभरे पाण्यात भिजवलेले १ कप

- शेव १/२ कप

- खजूर-चिंचेची चटणी २ कप

- हिरवी चटणी १/२ कप

- चाट मसाला १ टीस्पून

- लाल तिखट १ टीस्पून

राज कचोरी बनवण्याची पद्धत

सर्वप्रथम भल्ल्यासाठीचे सर्व साहित्य एकत्र करून बाजूला ठेवा. थोडे मीठ घालून हरभरा उकळवा. आता कचोरी बनवण्यासाठी सर्व साहित्य नीट मिक्स आणि पीठ मळून घ्या. हे पीठ दहा मिनिटे बाजूला ठेवा. मळलेल्या पिठाचे छोटे गोळे करून लहान पुऱ्या लाटून घ्या. प्रत्येक पुरीत एक चमचा तयार केलेले फिलिंग भरा आणि पुरी चारही बाजूंनी दुमडून मध्यभागी आणा आणि हलक्या हाताने दाबा. आता ही पुरी परत एकदा लाटून घ्या. कढईत तेल गरम करून या कचोऱ्या मध्यम आचेवर तळून घ्या. भल्ला बनवण्यासाठी पाण्यात भिजवलेल्या डाळी पाण्यातून काढून घ्या. त्यात हिरवी मिरची आणि आले घालून बारीक वाटून घ्या. चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा तेल घालून मिक्स करा. मऊ भल्ला बनवण्यासाठी हे मिश्रण एका दिशेने किमान दहा मिनिटे फेटा. तेल गरम करा आणि अर्धा चमचा मिश्रण गरम तेलात टाका. भल्ला सोनेरी होईपर्यंत तळून घ्या आणि नंतर अर्धा तास पाण्यात ठेवा. 

सर्व्ह करण्यापूर्वी राज कचोरी सजवा. कचोरीच्या मधोमध एक छिद्र करून त्यात दोन भल्ले ठेवा. त्यावर दही घाला. थोडा चाट मसाला शिंपडा. हिरवी चटणी घाला. उकडलेले बटाटे सोलून मॅश करून त्यात घाला. भिजवलेला हरभरा घाला. पुन्हा दोन-तीन चमचे दही आणि खजूर-चिंचेची चटणी घाला. हिरवी चटणी घाला. वर शेव, कोथिंबीर आणि चाट मसाला घालून सर्व्ह करा.

Whats_app_banner