Pumpkin Bhaji Recipe: दुपारच्या जेवणात रोज कोणती भाजी बनवायची हा मोठा प्रश्न महिलांना असतो. घरातील प्रत्येकाची आवड वेगळी असल्याने सर्वांना आवडेल असं बनवणे म्हणजे मोठी अडचण असते. अशीच एक भाजी म्हणजे भोपळा. अनेक घरातील मुलेच नाही तर मोठी माणसे देखील भोपळ्याची भाजी खाण्याचा कंटाळा करतात. अशा वेळी ही भाजी खायला द्यायची असेल तर ती बनवण्याची वेगळी पद्धत अवलंबावी लागेल. प्रत्येक जण ही भाजी वेगळ्या पद्धतीने बनवतो. ज्या जुन्या देशी पद्धतीने आंबट गोड चव असायची, त्याच पद्धतीने बनवायची असेल तर ही रेसिपी फॉसो करा. जाणून घ्या भोपळ्याची आंबट गोड भाजी कशी बनवायची.
ही भाजी बनवण्यासाठी खूप कमी गोष्टींची गरज असते. यासाठी मेथी दाणे, तमालपत्र, कलौंजी, ताजा भोपळा, मीठ, लाल तिखट, हळद, धणे पूड, गरम मसाला पावडर, आमचूर पावडर आणि साखर घ्या. तसेच भाजीला तडका देण्यासाठी आपल्या आवडीचे तेल घ्या. तसं मोहरीच्या तेलातील भाजी टेस्टी लागते.
ही भाजी बनवण्यासाठी कढई घेऊन त्यात तेल गरम करावे. गरम झाल्यावर त्यात तमालपत्र, कलौंजी आणि मेथी दाणे घालावे. आणि नंतर थोड्या पाण्यासोबत मीठ, लाल तिखट, हळद, धणे पूड घाला. मसाले चांगले भाजून घ्यावेत. आणि मग त्यात भोपळ्याचे छोटे छोटे तुकडे टाकून मिक्स करा. नंतर थोडा वेळ झाकून ठेवा. भोपळा झाकल्यानंतर किमान ७-१० मिनिटांत शिजतो. तपासून मग त्यात गरम मसाला, आमचूर पावडर आणि साखर घालून मिक्स करा. चांगले मिक्स झाल्यावर पुन्हा झाकून घ्या. साखर ३ ते ५ मिनिटांत विरघळेल. नंतर झाकण काढून भाजी एकदा ढवळा. आता कोथिंबिरीने सजवून सर्व्ह करा.