मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Lunch Recipe: दुपारच्या जेवणात बनवा प्रोटीनयुक्त मूग डाळची पोळी, वेट लॉससाठी उपयुक्त रेसिपी

Lunch Recipe: दुपारच्या जेवणात बनवा प्रोटीनयुक्त मूग डाळची पोळी, वेट लॉससाठी उपयुक्त रेसिपी

Hiral Shriram Gawande HT Marathi
Nov 21, 2023 12:31 PM IST

Protein Rich Recipe for Lunch: जर तुम्ही प्रथिनेयुक्त आहार घेत असाल, तर मूग डाळीपासून बनवलेली ही पोळी शाकाहारी लोकांसाठी उत्तम आहे. हे बनवायला खूप सोपे आहे आणि काही मिनिटांत ते तयार होते.

मूग डाळची पोळी
मूग डाळची पोळी

Moong Dal Roti Recipe: निरोगी राहण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी प्रोटीन रिच डायट घेण्याचा सल्ला दिला जातो. जर तुम्ही सकाळचा नाश्ता आणि दुपारच्या जेवणासाठी प्रथिनेयुक्त नवीन डिश शोधत असाल तर मूग रोटी हा योग्य पर्याय आहे. तुम्ही ते नाश्त्यापासून दुपारच्या जेवणापर्यंत कधीही खाऊ शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही मूग रोटीसोबत पराठेही तयार करू शकता. हे बनवायला खूप सोपे आहे आणि काही मिनिटांत बनवता येते. चला तर मग जाणून घेऊया प्रोटीन युक्त मूग डाळीची रोटी किंवा पोळी कशी बनवायची.

ट्रेंडिंग न्यूज

मूग डाळ रोटी बनवण्यासाठी साहित्य

- १ कप मूग डाळ

- १ कप गव्हाचे पीठ

- ८-१० पाकळ्या लसूण

- १ इंच आल्याचा तुकडा

- चवीनुसार मीठ

मूग डाळची पोळी बनवण्याची पद्धत

- सर्वप्रथम मूग डाळ दोन ते तीन तास भिजत ठेवा.

- डाळ नीट फुगल्यानंतर पाणी गाळून घ्या आणि डाळ मिक्सरच्या भांड्यात टाका.

- डाळीत चवीनुसार आले, लसूण आणि हिरवी मिरची घाला.

- थोडे पाणी घालून बारीक पेस्ट तयार करा.

- पेस्टमध्ये जास्त पाणी घालू नका, याची काळजी घ्या.

- मूग डाळीची तयार पेस्ट गव्हाच्या पिठात मिक्स करा.

- त्यात चवीनुसार मीठ घाला.

- दोन चमचे तेल घालून मूग डाळच्या पेस्टच्या मदतीने पीठ मळून घ्या.

- पीठ मळताना आवश्यक असल्यास पाणी घाला.

- मूग डाळीच्या पेस्टने पीठ सहज मळून जाते.

- आता तयार पिठाचे फक्त गोल गोळे करून पोळी लाटून घ्या.

- नेहमीच्या पोळीसारखी पोळी तयार करा. तुम्ही याचा पराठा सुद्धा बनवू शकता.

- तुमची प्रोटीनयुक्त मूग डाळीची पोळी तयार आहे. गरमागरम सर्व्ह करा.

- तुम्हाला हवे असल्यास तयार पिठापासून पराठे बनवून नाश्त्यात खाऊ शकता.

WhatsApp channel