Shravan Somvar Bhog: श्रावण सोमवारी महादेवाला अर्पण करा बटाट्याचा हलवा, झटपट तयार होते रेसिपी-how to make potato halwa recipe for shravan somvar bhog ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Shravan Somvar Bhog: श्रावण सोमवारी महादेवाला अर्पण करा बटाट्याचा हलवा, झटपट तयार होते रेसिपी

Shravan Somvar Bhog: श्रावण सोमवारी महादेवाला अर्पण करा बटाट्याचा हलवा, झटपट तयार होते रेसिपी

Aug 19, 2024 09:26 AM IST

Recipe for Shravan Somvar: श्रावण सोमवारचे उपवास करणारे लोक भोलेनाथाला जल अर्पण करतात. तुम्ही प्रसादासाठी काय बनवावे याचा विचार करत असाल तर बटाट्याच्या हलव्याची रेसिपी ट्राय करा.

बटाट्याचा हलवा
बटाट्याचा हलवा (freepik)

Potato Halwa Recipe: श्रावण सुरू होताच देशभरातील भाविक महादेवाची पूजा करू लागतात. या महिन्यात येणारे सोमवारही खूप खास असतात. श्रावण सोमवारी बहुतांश भाविक मनापासून भोलेनाथाची पूजा करतात आणि उपवासही ठेवतात. खऱ्या मनाने महादेवाची पूजा केल्यास इच्छित फळ मिळते, असे म्हटले जाते. श्रावण सोमवारी उपवास करण्यापूर्वी सर्व जण शिवलिंगाला जल अर्पण करतात आणि नंतर पूजा अर्चा करतात. यावेळी भगवान शंकराला विविध गोष्टी नैवेद्य म्हणून अर्पण केल्या जातात. तुम्हाला सुद्धा घरी प्रसादासाठी काय बनवावे हा प्रश्न पडला असेल तर तुम्ही बटाट्याचा हलवा बनवू शकता. ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे. तसेच झटपट तयार होते. चला तर मग जाणून घ्या कसा बनवायचा बटाट्याचा हलवा.

 

बटाट्याचा हलवा बनवण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे -

- ४ मोठे उकडलेले बटाटे

- देशी तूप

- १ कप साखर

- १ कप दूध

- १/२ टीस्पून वेलची पूड

- ४ बारीक चिरलेले बदाम

- ४ बारीक चिरलेले पिस्ता

- ४ बारीक चिरलेले काजू

- रंगासाठी केशर

बटाट्याचा हलवा बनवण्याची पद्धत

बटाट्याचा हलवा बनवण्यासाठी सर्वप्रथम बटाटे धुवून उकळून घ्यावेत. नंतर उकडलेले बटाट्याचे साल काढून घ्या आणि ते नीट मॅश करून घ्या. तुम्ही बटाटे किसून सुद्धा घेऊ शकता. आता एक नॉनस्टिक पॅन घ्या आणि त्यात देशी तूप घाला. नंतर त्यात मॅश केलेले बटाटे घालून चांगले परतून घ्या. हे लक्षात ठेवा की भाजताना ते सतत ढवळून घ्यावे लागेल. नंतर त्यात साखर घाला. चांगले मिक्स करा आणि नंतर पुन्हा थोडा वेळ परतून घ्या. चांगले भाजून झाल्यावर त्यात दूध घालावे. काही लोक दुधाऐवजी खवा वापरतात. अशा वेळी तुम्ही खवा देखील घालू शकता. 

नंतर शेवटी वेलची पूड आणि केशर घालून चांगले मिक्स करा. दूध कोरडे झाल्यावर त्यात बदाम, पिस्ता आणि काजू घालून मिक्स करा. नैवेद्यासाठी तुमचा बटाट्याचा हलवा तयार आहे. तुम्ही हा हलवा उपवासासाठी सुद्धा खाऊ शकता. शिवाय रक्षाबंधनाला भावाचे तोंड गोड करण्यासाठी सुद्धा हा हलवा सर्व्ह करू शकता.