मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Poha Cheela Recipe: नाश्त्यात काहीतरी हटके खायचं आहे? बनवा पोहे चिला! बघा रेसिपीचा Video

Poha Cheela Recipe: नाश्त्यात काहीतरी हटके खायचं आहे? बनवा पोहे चिला! बघा रेसिपीचा Video

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Jun 01, 2023 08:02 AM IST

Breakfast Recipe: जर तुम्हाला पोह्यांची नवीन डिश ट्राय करायची असेल तर तुम्ही पोह्याच्या चिल्याची सुपर टेस्टी रेसिपी ट्राय करू शकता.

Healthy Breakfast Recipe
Healthy Breakfast Recipe (@purna_recipes/ Instagram )

Healthy Recipe: ज्यांना पोहे आवडतात ते आवर्जून पोहे खातात. पण पोह्यांपासून वेगवेगळे पदार्थ बनवू शकता. पण तेच तेच खाऊन कंटाळा येतो. म्हणून तुम्ही पोह्यापासून वेगळी रेसिपी ट्राय करायला हवी. तुम्ही पोह्याच्या चिल्याची उत्तम रेसिपी करून पाहू शकता. हे खायला खूप चवदार आणि बनवायला तितकेच सोपे आहे. तसे, तुम्ही पोह्यांचे वेगवेगळे पदार्थ बनवत असाल. पण यावेळी पोह्यांची वेगळी चव चाखण्यासाठी तुम्ही पोह्यांची ही चवदार रेसिपी करून पाहू शकता. इन्स्टाग्राम वापरकरता @purna_recipes ने ही रेसिपी त्याच्या अकाउंटवर व्हिडीओद्वारे शेअर केली आहे.

लागणारे साहित्य

१ कप पोहे, १/३ कप बेसन, १/३ ओट्स पावडर, १ टीस्पून किसलेले गाजर, १ टीस्पून बारीक चिरलेला कांदा, १ टीस्पून बारीक चिरलेला टोमॅटो, १ टीस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, १ हिरवी मिरची चिरलेली, १ टीस्पून हळद , १ टीस्पून लाल तिखट, १ टीस्पून धनेपूड, चवीनुसार मीठ आणि तळण्यासाठी देसी तूप घ्या.

पोहे चिला बनवण्याची रेसिपी

प्रथम पोहे धुवून घ्या आणि दहा मिनिटे असेच ठेवा. भिजल्यावर फुगले की पोहे चांगले मॅश करा. नंतर त्यात बेसन आणि ओट्स पावडर मिसळा. आता पोह्यात गाजर, कांदे, टोमॅटो, हिरवी कोथिंबीर आणि हिरवी मिरची घाला. नंतर त्यात हळद, लाल तिखट, धनेपूड आणि मीठ घाला. आता त्यात अर्धा कप पाणी घाला आणि सर्वकाही चांगले मिसळा आणि पीठ तयार करा. नंतर एका नॉनस्टिक तव्यावर एक चमचा तूप लावून त्यावर दोन ते तीन चमचे पोह्याचे मिश्रण टाकावे. तव्यावर गोल आकारात पसरवून चिला बनवा. नंतर ते सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या आणि नंतर हलक्या हातांनी पलटून दुसऱ्या बाजूलाही भाजून घ्या. तुमचा गरमागरम पोहे चिला तयार आहे. चटणीबरोबर सर्व्ह करा.

WhatsApp channel

विभाग