Pizza Dhokla Recipe: लहान मुले असो वा मोठे, सर्वांनाच पिझ्झा खायला आवडतो. पण बाहेर नेहमी नेहमी पिझ्झा खाणे अनहेल्दी असते. विशेषत: सकाळच्या नाश्त्यात पिझ्झा अजिबात खाऊ नये. पण अनेक वेळा सकाळच्या नाश्त्यात नेहमीचे तेच ते पदार्थ खाऊन कंटाळा येतो. आणि रोज नवीन काय बनवावे हा प्रश्न उभा राहतो. तुम्हाला सुद्धा नाश्त्यात काय बनवायचे हा प्रश्न पडला असेल तर ही रेसिपी तुमची मदत करेल. तुम्ही कमी वेळेत पिझ्झा ढोकळा बनवू शकता. ही रेसिपी एकदम सोपी आहे आणि खायला टेस्टी आहे. चला तर मग जाणून घ्या कसा बनवायचा पिझ्झा ढोकळा.
- ३/४ वाटी रवा
- १/४ वाटी दही
- ३/४ वाटी पाणी
- मीठ चवीनुसार
- २-३ कांदे
- स्वीट कॉर्न
- २ शिमला मिरची बारीक चिरलेली
- मिक्स हर्ब्स
- २ टीस्पून चिली फ्लेक्स
- २ टीस्पून पिझ्झा सॉस
- १ कप चीज
- इनो
नाश्त्यात पिझ्झा ढोकला बनवण्यासाठी प्रथम एका भांड्यात रवा आणि दही मिक्स करा. आता हे अर्धा तासासाठी बाजूला ठेवा. नंतर त्यात पाणी घालून थोडे पातळ बॅटर बनवा आणि चांगले फेटून घ्या. आता त्यात मीठ घाला. नंतर बारीक चिरलेली शिमला मिरची, स्वीट कॉर्न, बारीक चिरलेला कांदा टाकून मिक्स करा. शेवटी इनो टाकून फेटून घ्या. जेणेकरून हे बॅटर चांगले फुलेल.
आता एका खोल भांड्याला तेल लावून तळाला ग्रीस करा. तयार केलेले बॅटर यात टाका. वर पिझ्झा सॉस लावा आणि पनीर घालून वाफवून घ्या. तुमचा पिझ्झा ढोकळा तयार आहे. आवडत्या आकारात कट करा आणि गरमा गरम सर्व्ह करा.
संबंधित बातम्या