Diwali Decoration: दिवाळीत डेकोरेशनसाठी बनवा कागदाचे सुंदर दिवे, सगळेच करतील कौतुक!
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Diwali Decoration: दिवाळीत डेकोरेशनसाठी बनवा कागदाचे सुंदर दिवे, सगळेच करतील कौतुक!

Diwali Decoration: दिवाळीत डेकोरेशनसाठी बनवा कागदाचे सुंदर दिवे, सगळेच करतील कौतुक!

Published Nov 11, 2023 01:16 PM IST

Diwali 2023: दिवाळीत कागदापासून कंदील तर बनवलाच जातो. पण या सोबतच तुम्ही डेकोरेशनसाठी कागदी दिवे बनवू शकता.

Home Decoration
Home Decoration (@gujaranicreations / Instagram )

Paper Diya For Diwali: दिवाळीच्या सजावटीला कधीच सुरुवात झाली आहे. पण तरीही अजून छोटे मोठे डेकोरेशन सुरूच आहे. प्रत्येकालाच आपलं घर खूप वेगळं आणि सुंदर दिसावं असं वाटतं. पाहुणे आणि मित्र घरी येतात आणि सजावटीची प्रशंसा करतात तेव्हा कोणाला आवडत नाही? तुम्हालाही या दिवाळीत काहीतरी वेगळं, अनोखं आणि सुंदर बनवायचं असेल, तर इथे जाणून घ्या कागदापासून दिव्यांची तार कशी बनवता येते. या कागदी दिव्यांची तार तुम्ही दारावर, भिंतीवर किंवा छताला टांगू शकता. ही कागदाची स्ट्रिंग रंगीबेरंगी कागदांपासून बनविली जाऊ शकते किंवा तुम्ही फक्त एक किंवा दोन रंगांचे दिवे तयार करू शकता.

असे बनवा कागदी दिवे

कागदी दिवे बनवण्याचा हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर @gujaranicreations नावाच्या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही या व्हिडीओमध्ये दिवे बनवण्यासाठी वापरलेले रंग देखील निवडू शकता. दिवे बनवण्यासाठी लाल आणि पिवळ्या रंगाचे पेपर घ्या. दिव्यांची तयार बनवण्यासाठी तुम्हाला थ्रेड देखील लागेल.

सर्व प्रथम, लाल पेपर घ्या आणि गोलाकार कट करा. आता हे वर्तुळाकार पत्र अर्ध्यामध्ये दुमडून घ्या आणि उरलेले अर्धे अर्धे दुमडून घ्या. एक दिवा तयार करण्यासाठी, आपल्याला अशा ८ गोलाकार शीट्स घेणे आवश्यक आहे. या ८ दुमडलेल्या वर्तुळाकार शीट्सला व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे ग्लू गन वापरून कडा पेस्ट करा किंवा तुम्ही फेविकॉल देखील वापरू शकता.

एक वर्तुळ पूर्ण झाल्यावर त्यावर ज्योतीच्या आकाराची पिवळा पेपर कापून चिकटवा. तुमचा दिवा तयार आहे. या दिव्याच्या ज्योतीवर धागा चिकटवून तार बनवता येते. या दिव्यांना हव्या त्या ठिकाणी लटकवून तुम्ही तुमचे घर सजवू शकता.

Whats_app_banner