Papdi Chaat Recipe: संध्याकाळच्या नाश्त्यासाठी घरीच बनवा पापडी चाट, नोट करा रेसिपी!
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Papdi Chaat Recipe: संध्याकाळच्या नाश्त्यासाठी घरीच बनवा पापडी चाट, नोट करा रेसिपी!

Papdi Chaat Recipe: संध्याकाळच्या नाश्त्यासाठी घरीच बनवा पापडी चाट, नोट करा रेसिपी!

Published Feb 18, 2024 03:41 PM IST

Evening Snacks Ideas: पापडी चाट हा एक स्ट्रीट फूड आहे जो लोकांना खूप आवडतो. संध्याकाळी खाण्यासाठी हा एक बेस्ट पदार्थ आहे.

how to make papdi chaat
how to make papdi chaat (freepik)

Street type papdi chaat recipe: आपल्याला संध्याकाळी काहीतरी चटपटीत खावेसे वाटते. अशावेळी अनेकदा स्ट्रीट फूडचा आस्वाद घ्यावासा वाटतो. पण, चाट खाण्यासाठी कधी कधी बाहेर जाणं शक्य होत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही घरीच चाट बनवू शकता. तुम्ही घरी पापडी चाट बनवून खाऊ शकता. या स्ट्रीट फूडची चव फारच अप्रतिम लागते. याशिवाय हे आरोग्यदायी देखील आहे आणि ते खाल्ल्याने गॅस आणि अपचनाची समस्या देखील टाळता येते. चला तर मग, पापडी चाटची रेसिपी.

कसं बनवायचा पापडी चाट?

> सर्वात आधी पापडी बनवण्यासाठी मैदा घ्या आणि त्यात मीठ आणि तूप मिसळा. नंतर गरम पाण्याने मळून घ्या.

> आता प्रथम चिंच आणि जिऱ्याची गोड चटणी बनवा. यासाठी चिंच बारीक करून त्यात जिरेपूड घालून मिक्स करावे. नंतर एक पॅन घ्या आणि त्यात थोडे तेल घाला. जिरे किंवा मोहरी आणि कढीपत्ता घाला. नंतर चिंच आणि जिरे बारीक करून मिक्स करावे.

> तसेच पुदिना आणि कोथिंबीरीची चटणी तयार करा.

> आता पीठ लाटून त्यात काट्याच्या साहाय्याने छिद्र करा.

> आता त्याचे झाकण ठेवून गोल तुकडे करून घ्या आणि नंतर तेलात टाकून तळून घ्या.

> आता ही पापडी काढा.

> नंतर १ वाटी दही घ्या आणि त्यात थोडे मीठ आणि साखर घालून फेटून घ्या.

> नंतर एका प्लेटवर पापडी व्यवस्थित करून त्यावर फोडलेले उकडलेले बटाटे घाला.

> नंतर त्यावर दही टाका आणि कांदा कटर घाला.

> त्यावर कोथिंबीर आणि चिंचेची चटणी टाका.

> जिरेपूड आणि मीठ घाला.

> कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या घाला.

> पुन्हा चिरलेला कांदा घाला.

> सर्वकाही एकत्र सर्व्ह करा.

Whats_app_banner