Panipuri Pani Recipe: गाडीवर मिळणाऱ्या पाणीपुरीची चव अप्रतिम असते. परंतु पावसाळ्यात संसर्ग टाळण्यासाठी बाहेर मिळणारी पाणीपुरी किंवा गोलगप्पे खाणे अनेक लोक टाळतात. शिवाय नुकतेच कर्नाटकातील पाणीपुरीमध्ये कॅन्सरसारखे प्राणघातक आजार पसरवणारी रसायने आढळून आली. अशावेळी रस्त्याच्या बाजूला गाड्यांवर मिळणाऱ्या पाणीपुरीची चव चाखायला घाबरत असाल तर या पावसाळ्यात तुम्ही घरच्या घरी पाणीपुरीचे चटपटीत पाणी बनवून पाणीपुरीचा आनंद घेऊ शकता. फक्त ही सोपी रेसिपी फॉलो करा.
- कैरी २-३
- एक चमचा जिरे भाजलेले
- एक चमचा धने भाजलेले
- एक मूठभर पुदिन्याची पाने
- हिरवी मिरची ४-५
- काळी मिरी ५-६
- ओवा अर्धा चमचा भाजलेली
- एक चमचा आमचूर पावडर
- मीठ चवीनुसार
- काळे मीठ एक चमचा
- गरम पाणी दोन लिटर
- एक ते दोन लिंबाचा रस
सर्वप्रथम कैरीची सालासकट धुवून कुकरमध्ये लावा आणि दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये उकळून घ्या. आता एका भांड्यात दोन लिटर पाणी गरम करा. आता या पाण्यात चवीनुसार मीठ आणि काळे मीठ घालावे. गॅसवरून पाणी खाली काढून थंड होऊ द्या. कैरी उकळले की थंड करा. थंड झाल्यावर कैरीचा गर नीट काढून घ्या. हा पल्प मीठ मिसळून कोमट पाण्यात घाला. तव्यावर जिरे कोरडे भाजून घ्यावेत. धने, ओवा, काळी मिरी सुद्धा कोरडे भाजून घ्या. आता एका ग्राइंडर जारमध्ये जिरे, धने, काळी मिरी, ओवा पावडर बनवून घ्या. आता सर्व काही पाण्यात टाका. जर तुम्हाला कमी तिखट आवडत असेल तर काळी मिरीचे प्रमाणाची काळजी घ्या. पुदिना आणि हिरव्या मिरच्या बारीक करून पेस्ट तयार करा. तयार गरम पाण्यात ही पेस्ट घाला. चांगले मिक्स करा आणि हे पाणी कमीत कमी तीन ते चार तास झाकून ठेवा.
नंतर हे पाणी गाळून घ्या. जेणेकरून त्यात कोणत्याही प्रकारचे खडे मसाले शिल्लक राहणार नाहीत. तुमचे टेस्टी आणि चटपटीत पाणी तयार आहे. तुम्हाला आवडत असेल तर यात बुंदी टाका. पाणीपुरीसोबत सर्व्ह करा.
संबंधित बातम्या