भारतात सर्वाधिक जर कुठल्या भाजीची क्रेझ असेल तर ती म्हणजे पनीरच्या भाजीची. सण असू देत किंवा मोठे लग्नकार्य पनीरची भाजी ही जेवणात असतेच असते. घरातील मुलांना देखील पनीरची भाजी फार आवडते. पण बाजारात मिळणारे पनीर हे महाग असते आणि ते सतत खाणे आरोग्यासाठी चांगले देखील नसते. त्यामुळे घरच्या घरी पनीर कसे बनवता येईल याकडे गृहीणींचे लक्ष असते. तुम्हाला माहिती आहे का दुधी भोपळ्यापासून देखील पनीर बनवता येते. हो तुम्ही अगदी बरोबर ऐकले आहे. त्यासाठी काय साहित्य लागते चला जाणून घेऊया...
-छोटा दुधी भोपळा
-अर्धी वाटी तांदळाचे पीठ
-दूध पावडर
-एक चमचा दही
-चिमूटभर मीठ
दुधी भोपळ्यापासून पनीर बनवण्यासाठी सर्वात आधी एक दुधी भोपळा घ्यावा. जर दुधी भोपळा मोठा असेल तर अर्धाच भाग कापूर घ्या. तो स्वच्छ धुवून त्याचे छोटेछोटे तुकडे करा. त्यानंतर दुधी भोपळ्याचे तुकडे मिक्सरमधून काढून त्याची पेस्ट तयार करावी. गरज लागल्यास त्यामध्ये थोडे पाणी घालावे. पण पाण्याचे प्रमाण हे कमी असेल असा प्रयत्न ठेवा.
वाचा: गुडघेदुखीपासून आराम हवा? मग पंतप्रधान मोदींनी सांगितले पदहस्तासन नक्की करा
आता या दुधी भोपळ्याच्या पेस्टमध्ये अर्धा कप तांदळाचे पीठ घाला. जर तुमच्याकडे तांदळाचे पीठ नसेल तर तुम्ही मैद्याचाही वापर करू शकता. आता त्यात एक चमचा दूध पावडर, हलके मीठ, एक चमचा दही आणि दोन चमचे सोडा घाला. या सर्व गोष्टी पाणी न घालता नीट फेटून घ्याव्या लागतात. त्यानंतर एक मोठे ताट घ्या. या ताटाला आतून थोडे तेल किंवा तूप लावा. त्यानंतर दुधी भोपळ्याची तयार केलेली पेस्ट त्यावर टाका. ज्याप्रमाणे तुम्ही घरी मिठाई बनवता, तशीच ही पेस्ट संपूर्ण प्लेटवर समप्रमाणात पसरवा. आता हे पनीर शिजवण्याची वेळ आली आहे. पनीर शिजवण्यासाठी कढईत पाणी गरम करावे लागते. आता त्यावर एक वाटी किंवा कोणतेही भांडे ठेवा. या भांड्यावर आपली पनीर प्लेट ठेवा आणि झाकून ठेवा.
वाचा: मटण बिर्याणी शिवाय अपूर्ण आहे बकरी ईद! नोट करा सोपी हैदराबादी रेसिपी
हे पनीर मध्यम आचेवर साधारण १० ते १५ मिनिटे शिजू द्या. यानंतर ही प्लेट काढून टूथपिक किंवा चाकूच्या साहाय्याने तुमचे पनीर शिजले की नाही हे तपासून पाहा. शिजल्यानंतर गॅस बंद करा आणि ते ताट बाहेर काढून ठेवा. ताट थंड झाल्यावर पनीरचे छोटे छोटे तुकडे करा. तुमचे चवीष्ठ दुधी भोपळ्यापासून बनवलेले पनीर तयार आहे. हे पनीर शरारीसाठी खूप चांगले असते.
संबंधित बातम्या