Paneer Popcorn Recipe: संध्याकाळी चहासोबत स्नॅक्स खायला सर्वांनाच आवडते. नेहमीचे तेच ते प्रकार खाऊन कंटाळा येतो. अशा वेळी काहीतरी नवीन पदार्थ ट्राय करायचं असेल तर तुम्ही हे पनीर पॉपकॉर्न बनवू शकता. हे बनवायला खूप सोपे आणि खायला टेस्टी आहे. ही रेसिपी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल. चला तर मग जाणून घ्या कसे बनवायचे पनीर पॉपकॉर्न.
- पनीर चौकोनी तुकडे - २०० ग्रॅम
- कॉर्न फ्लोर - १/४ कप
- हळद - १/४ टीस्पून
- लाल तिखट - १ टीस्पून
- काळी मिरी पावडर - १/२ टीस्पून
- ओरेगॅनो - १ टीस्पून
- लसूण पेस्ट - १ टीस्पून
- मीठ - चवीनुसार
- तेल - आवश्यकतेनुसार
- ब्रेड क्रम्ब्स - आवश्यकतेनुसार
एका मोठ्या भांड्यात कॉर्न फ्लोर, हळद, लाल तिखट, काळी मिरी पावडर, ओरेगॅनो, आले-लसूण पेस्ट आणि चवीनुसार मीठ एकत्र करून चांगले मिक्स करा. थोडे थोडे पाणी घालून घट्ट पेस्ट तयार करा. आता या बॅटरमध्ये पनीरचे सर्व तुकडे टाकून नीट मिक्स करून घ्या. साधारण पाच ते दहा मिनिटे हे झाकून बाजूला ठेवा. आता पनीरचे सर्व तुकडे एका प्लेटमध्ये एक-एक करून ठेवा. ब्रेड क्रम्ब्स दुसऱ्या प्लेटवर पसरवा. आता पिठात बुडवलेले पनीरचे तुकडे ब्रेड क्रम्ब्सवर एक-एक करून ठेवा. आता हे एका प्लेटमध्ये ठेवून झाकून ठेवा. आता पनीरचे हे तुकडे १५ ते २० मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा. आता एका कढईत तेल गरम करून पनीर पॉपकॉर्न सोनेरी होईपर्यंत तळून घ्या.
अतिरिक्त तेल काढून टाकण्यासाठी एका प्लेटमध्ये टिश्यू ठेवून त्यावर पेपर पनीर पॉपकॉर्न काढून ठेवा. तुमचे पनीर पॉपकॉर्न रेडी आहे. आपल्या आवडत्या चटणी किंवा सॉसबरोबर गरमागरम सर्व्ह करा.