मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Paneer Kulcha Recipe: मैदा सोडून गव्हापासून बनवा पनीर कुलचा, जाणून घ्या बनवण्याची सोपी पद्धत!

Paneer Kulcha Recipe: मैदा सोडून गव्हापासून बनवा पनीर कुलचा, जाणून घ्या बनवण्याची सोपी पद्धत!

Jan 16, 2024 06:37 PM IST

Healthy Kulcha Recipe: कुलचा मैदापासून बनवला जातो. पण तुम्हाला हा कुलचा हेल्दी पद्धतीने बनवायचा असेल तर तुम्ही ही रेसीपी फॉलो करू शकता.

how to make paneer kulcha with wheat flour
how to make paneer kulcha with wheat flour (freepik)

Paneer kulcha with wheat flour: पंजाबी कुलचा कोणाला आवडत नाही. त्याचे नाव ऐकताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. मोठमोठ्या रेस्टॉरंटपासून ते गल्लीबोळातल्या गाड्यांवर हे कुलचे मिळतात. हे इतके टेस्टी असतात की याचे लहान ते मोठे असे सगळेच चाहते आहेत. पण आरोग्याची काळजी असलेले लोक हा पदार्थ खाणे टाळतात. कारण कुलचा हा मैद्यापासून बनवलेला असतो. तुम्हीही तुमच्या तब्येतीची काळजी घेत असाल तर तुम्ही मैदा सोडून तुम्ही गव्हाच्या पिठापासून कुलचा बनवू शकता. यासाठीच आम्ही तुमच्यासाठी ही मस्त रेसिपी घेऊन आलो आहोत. गव्हाच्या पिठापासून बनवलेले हे पनीर कुलचे आरोग्याच्या दृष्टीने उत्तम आहे. चला तर मग जाणून घेऊयात सोपी रेसिपी...

लागणारे साहित्य

दोन कप पीठ

दोन चमचे बेकिंग पावडर

ट्रेंडिंग न्यूज

दोन चमचे दही

एक टेबल चमचा

थोडे मीठ

दीड टीस्पून साखर

तेल

जाणून घ्या कृती

२ कप गव्हाच्या पिठात दोन चमचे बेकिंग पावडर, थोडे मीठ आणि दीड चमचे साखर घाला. यानंतर थोडे दही आणि एक चमचा तेल घालून पिठात चांगले मिसळा. आता कोमट पाणी घेऊन पीठ मळून घ्या. पीठ मळून झाल्यावर त्यावर तेल लावून अर्धा तास तसंच ठेवून द्या.

पनीरचे स्टफिंग

स्टफिंग बनवण्यासाठी २०० ग्रॅम किसलेले पनीर, बारीक चिरलेला कांदा, गाजर, हिरवी मिरची, आले आणि थोडी कोथिंबीर, मीठ, भाजलेले जिरेपूड, चाट मसाला हे सर्व साहित्य एकत्र करून मिश्रण तयार करा.

कुलचा कसा बनवायचा?

मळलेल्या पिठाचा एक गोळा बनवून त्याला मधेच खोलगट बनवा. त्या खोलगट आकारात बनवलेले पनीरचे स्टफिंग भरा. वरून हा पिठाचा गोळा बंद करून घ्या. बंद केल्यानंतर हलकासा कुलचा लाटून घ्या. आता त्यावर पांढरे तीळ हलकेच शिंपडा आणि पुन्हा हलकासा दाबून लाटून घ्या. यामुळे तीळ कुलचाला चिकटतील. आता गरम तव्यावर थोडं पाणी शिंपडा आणि कुलचा त्यावर घाला. आता लगेच झाकून ठेवा आणि पाच मिनिटे शिजवा. नंतर कुलचा पलटून घ्या आणि पुन्हा तव्यावर पाणी शिंपडा आणि झाकून ठेवा. कुलचा तयार आहे. आता तव्यावरून कुलचा खाली घेऊन त्यावर बटर लावा.

WhatsApp channel