Paneer Jalebi Recipe: श्रावण महिना सुरू आहे. या काळात लोक सात्त्विक अन्न खातात आणि भक्ती भावाने भोलेनाथाची पूजा करतात. श्रावण सोमवारी सकाळी शिवलिंगावर पाणी, फुले आणि प्रसाद अर्पण करतात. आज श्रावणातील दुसऱ्या सोमवारी नैवेद्याला काही नवीन बनवण्याचा विचार करत असाल तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे. येथे आम्ही पनीर जिलेबी कशी बनवायची ते सांगत आहोत. पनीर जिलेबी ही दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थान सारख्या उत्तरेकडील राज्यांमध्ये लोकप्रिय मिठाई आहे. ही घरी सहज बनवता येते. चला तर मग जाणून घ्या पनीर जिलेबीची सोपी रेसिपी.
- २०० ग्रॅम पनीर
- २०० ग्रॅम मैदा
- ५० ग्रॅम रवा
- १०० ग्रॅम खवा
- ८ ते १० हिरवी वेलची
- १ लिटर साखरेचा पाक
- तळण्यासाठी तूप
- मिक्स ड्रायफ्रूट्स कापलेले
जिलेबी बनवण्यासाठी पनीर, मैदा, रवा, खवा या सर्व गोष्टी मिक्स करून याचे घट्ट बॅटर तयार करा. त्यात गरजेनुसार पाण्याचा वापर करा. नंतर हे पीठ स्मूद होईपर्यंत चांगले फेटून घ्या. आता एका कढईत तळण्यासाठी तूप गरम करा. आता हे तयार केलेले बॅटर सॉसच्या बाटलीत टाकून जलेबी बनवा. या जलेबी तुपातून काढून गरम साखरेच्या पाकात टाका आणि काही वेळ भिजत ठेवा. नंतर कापलेल्या मिक्स ड्रायफूट्सने सजवा. तुम्हाला जिलेबीला रंग हवा असेल तर साखरेच्या पाकात १ ते २ पिंच पिवळा खायचा रंग घालू शकता. त्याचबरोबर पाकला चांगला रंग आणि सुगंधासाठी तुम्ही त्यात केशरही घालू शकता. तुमची पनीर जिलेबी तयार आहे.
साखरेचा पाक तयार करण्यासाठी एका भांड्यात साखर आणि १ कप पेक्षा थोडे जास्त पाणी घाला. नंतर साखर विरघळण्यासाठी २ ते ३ मिनिटे शिजू द्या. पाक तयार झाला की नाही हे तपासण्यासाठी चमच्यावर २ ते ३ थेंब घ्या. थंड झाल्यावर ते बोटात आणि अंगठ्यात चिकटवून ते मधासारखे चिकटले पाहिजे हे पहा. पाकाचे तार बनवण्याची गरज नाही. त्यात केशर घाला आणि तुमचा साखरेचा पाक तयार आहे.