Paneer Hyderabadi Recipe: जर तुम्हाला पनीर खाण्याची आवड असेल आणि दुपारच्या जेवणात पनीरची वेगळी आणि टेस्टी रेसिपी ट्राय करायची असेल, तर तुम्हाला पनीर हैदराबादी रेसिपी नक्कीच आवडेल. हैदराबादची बिर्याणी रेसिपीच नाही तर पनीरची रेसिपीही खूप प्रसिद्ध आहे. 'हैदराबादी पनीर मसाला' ची चव जितकी छान आहे तितकीच त्याची रेसिपीही सोपी आहे. चला तर मग जाणून घ्या पनीर हैदराबादीची ही टेस्टी रेसिपी.
- पनीर - ४०० ग्रॅम
- कांदा - २ (मोठे)
- हिरव्या मिरच्या - ३
- पुदिन्याची पाने - १/२ कप
- कोथिंबीर - १/२ कप
- काजू - १०
- लसूण पाकळ्या - १०
- आले - २ इंच
- तेल
- लवंग - ३
- दालचीनी - एक छोटी काडी
- शाही जिरा - १/२ टीस्पून
- लाल तिखट - १ टीस्पून
- गरम मसाला - १/२ टीस्पून
- धने पावडर - १/२ टीस्पून
- हळद - १/२ टीस्पून
- दही – १/२ कप
- फ्रेश क्रीम - १/२ कप
- कसुरी मेथी - १ चमचा
- मीठ
पनीर हैदराबादी बनवण्यासाठी प्रथम एका पॅनमध्ये १ टेबलस्पून तेल गरम करा, त्यात पनीरचे तुकडे घाला आणि दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत तळा. यानंतर त्याच कढईत ३ टेबलस्पून तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, लसूण पाकळ्या, आले आणि काजू घालून हलके तपकिरी होईपर्यंत तळा. आता या सर्व गोष्टी थंड करून मिक्सरमध्ये टाका आणि पेस्ट तयार करा. आता एका कढईत ३ टेबलस्पून तेल गरम करा आणि त्यात संपूर्ण गरम मसाला आणि मसाल्याची पेस्ट घाला. मसाल्यांचा कच्चा वास निघेपर्यंत मसाले ढवळत राहा. आता मसाला पावडर घाला आणि तेल वेगळे होईपर्यंत शिजवा. तुमच्या चवीनुसार ग्रेव्हीची कंसिस्टंसी करण्यासाठी पाणी आणि मीठ घाला.
आता त्यात फेटलेले दही आणि फ्रेश क्रीम घालून मिक्स करा. ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत शिजवा. आता या ग्रेव्हीमध्ये तळलेले पनीर, कसुरी मेथी आणि कोथिंबीर घाला. तुमचे टेस्टी पनीर हैदराबादी तयार आहे. गरमागरम पराठ्यासोबत सर्व्ह करा.
संबंधित बातम्या