Palak Paneer Paratha: ब्रेकफास्टमध्ये खायचंय काही स्पेशल तर बनवा पालक पनीर पराठा, ट्राय करा हेल्दी रेसिपी
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Palak Paneer Paratha: ब्रेकफास्टमध्ये खायचंय काही स्पेशल तर बनवा पालक पनीर पराठा, ट्राय करा हेल्दी रेसिपी

Palak Paneer Paratha: ब्रेकफास्टमध्ये खायचंय काही स्पेशल तर बनवा पालक पनीर पराठा, ट्राय करा हेल्दी रेसिपी

Mar 01, 2024 09:28 AM IST

Breakfast Recipe: जर तुम्हाला सकाळच्या नाश्त्यात काही टेस्टी आणि हेल्दी खायचे असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी परफेक्ट आहे. तुम्ही पालक पनीर पराठा बनवू शकता.

पालक पनीर पराठा
पालक पनीर पराठा

Palak Paneer Paratha Recipe: सकाळचा नाश्ता हा फक्त टेस्टीच नाही तर हेल्दीही असावा यासाठी महिला विविध पदार्थ ट्राय करत असतात. तुम्हाला सुद्धा असे काहीतरी बनवायचे असेल तर तुम्ही पालक पनीर लच्छा पराठा बनवू शकता. ही रेसिपी बनवायला थोडी मेहनत घ्यावी लागेल. पण चवीसोबत हा पराठा आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. ही रेसिपी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल. चला तर मग जाणून घ्या कसा बनवायचा पालक पनीर लच्छा पराठा

पालक पनीर पराठा बनवण्यासाठी साहित्य

- २०० ग्रॅम पालक

- २०० ग्रॅम पनीर

- १ कप गव्हाचे पीठ

- पुदिन्याची पाने

- कोथिंबीर

- ४-५ लसूण पाकळ्या

- हिरवी मिरची ३-४

- मेथी दाणे

- तूप किंवा बटर

- १ कांदा बारीक चिरलेला

- आले, हिरवी मिरची बारीक चिरलेली

- जिरे पावडर

- धने पावडर

- मीठ

पालक पनीर पराठा बनवण्याची पद्धत

पालक पनीर लच्छा पराठा बनवण्यासाठी सर्वप्रथम पालक चांगले धुवून घ्या. कढईत पाणी गरम करून त्यात पालक टाका. पालक शिजल्यावर बाहेर काढून थंड करा. मिक्सर जारमध्ये उकडलेल्या पालकाच्या पानांसोबत कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने मिक्स करा. त्यात लसूण आणि हिरवी मिरची घालून चांगली पेस्ट बनवा. गव्हाचे पीठ किंवा मैदा घेऊन त्यात एक चमचा देशी तूप किंवा बटर घाला. पालक पेस्ट घालून पीठ घट्ट मळून घ्या. पनीरचे फिलिंग बनवण्यासाठी पनीर मॅश करा. त्यात बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची घाला. तसेच मीठ, जिरे पावडर आणि धनेपूड घालून मिक्स करा. आता हे तयार मिश्रण पालकाच्या पीठात भरा किंवा रोल करून लच्छा पराठा तयार करा. दोन्ही बाजूंनी सोनेरी भाजून घ्या. रायता किंवा चटणीसोबत गरमागरम पराठा सर्व्ह करा.

Whats_app_banner