मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Palak Sabji Recipe: आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे पालक, या २ रेसिपीने बनवा टेस्टी भाजी

Palak Sabji Recipe: आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे पालक, या २ रेसिपीने बनवा टेस्टी भाजी

Hiral Shriram Gawande HT Marathi
Feb 12, 2024 01:19 PM IST

Palak Bhaji Recipe: विविध पोषक तत्वांनी समृद्ध पालकाचा आहारात समावेश करणे फायदेशीर असते. पण अनेकांना त्याची भाजी आवडत नाही. तुम्ही रेसिपीने पालकाची भाजी बनवली तर सगळे आवडीने खातील.

पालकाची भाजी
पालकाची भाजी (freepik)

Palak Bhaji or Sabji Recipe: पालक आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. आपण त्याचा आहारात वेगवेगळ्या प्रकारे समावेश करू शकतो. अनेक वेळा नेहमीची भाजी, पराठे खाण्याचा कंटाळा येतो. अशा परिस्थितीत तुम्ही वेगळ्या प्रकारे पालकाची टेस्टी भाजी बनवू शकता. आम्ही तुम्हाला पालकाची २ प्रकारच्या भाजीची रेसिपी सांगत आहोत. या रेसिपी फॉलो करून तुम्ही पालकाची टेस्टी भाजी बनवू शकता. पालक पनीर आणि पालक पनीर भुर्जी या दोन्ही भाज्या बनवायचा सोप्या आहेत आणि खायलाही टेस्टी आहेत. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना ती आवडेल. चला तर जाणून घ्या पालकाच्या भाजीची रेसिपी.

पालक पनीर

साहित्य

- पालक प्युरी - दीड कप

- पनीर - अर्धा किलो

- तेल - १/४ कप

- जिरे - १ टीस्पून

- तमालपत्र - १

- बारीक चिरलेले आले - १ टीस्पून

- बारीक चिरलेला लसूण -१ टीस्पून

- किसलेला कांदा - १/२ कप

- बारीक चिरलेला टोमॅटो- १ कप

- गरम मसाला- १/४ टीस्पून

- लाल तिखट- १/२ टीस्पून

- धने पावडर- १ टीस्पून

- मीठ- २ चमचे

कृती

पनीरचे हवे तसे तुकडे करून हलके सोनेरी होईपर्यंत तळून घ्या. कढईत तेल गरम करून त्यात जिरे टाका. नंतर त्यात तमालपत्र, आले आणि लसूण टाका. आता त्यात कांदा घाला. सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या आणि नंतर पॅनमध्ये टोमॅटो घाला आणि मध्यम आचेवर थोडा वेळ शिजवा. टोमॅटोमधून तेल वेगळे व्हायला लागल्यावर पॅनमध्ये गरम मसाला, मीठ, धनेपूड आणि लाल तिखट घालून मिक्स करा. पालक प्युरी घाला आणि दोन ते तीन मिनिटे शिजवल्यानंतर पॅनमध्ये पनीरचे तुकडे घाला. ग्रेव्ही घट्ट असेल तर थोडे पाणी घालून पातळ करा. दोन-चार मिनिटे मंद आचेवर शिजवून गॅस बंद करा. तुमची भाजी तयार आहे.

पालक पनीर भुर्जी

साहित्य

- बारीक चिरलेला पालक - २ कप

- किसलेले पनीर - १ कप

- टोमॅटो - २

- हिरव्या मिरच्या - २

- आले-लसूण पेस्ट - १ चमचा

- चिरलेली कोथिंबीर- १ टीस्पून

- लिंबाचा रस- १ टीस्पून

- लाल तिखट- १/२ टीस्पून

- गरम मसाला - १ चमचा

- धने पावडर - १/२ टीस्पून

- जिरे पावडर - १/२ टीस्पून

- हळद - १/४ टीस्पून

- जिरे- १/२ टीस्पून

- मीठ- चवीनुसार

- तेल- 1 टीस्पून

कृती

सर्वप्रथम कढईत तेल गरम करून त्यात जिरे घाला. जिरे तडतडल्यावर त्यात आले-लसूण पेस्ट आणि चिरलेली हिरवी मिरची घाला. एक मिनिट परतून घ्या आणि कांदा घालून सोनेरी होईपर्यंत परता. आता पालक घालून शिजवा. पालक शिजल्यावर त्यात टोमॅटो, मीठ, लाल तिखट, हळद, धनेपूड, जिरेपूड आणि गरम मसाला घालून मिक्स करून घ्या. टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवा. याता यात किसलेले पनीर घालून दोन-तीन मिनिटे परतून घ्या. लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालून मिक्स करा. तुमची पालक पनीर भुर्जी तयार आहे.

WhatsApp channel