Palak Kebab: चहाची मजा द्विगुणीत करेल पालक कबाबची रेसिपी, घरी बनवणे आहे खूप सोपे-how to make palak kebab recipe for tea time snacks ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Palak Kebab: चहाची मजा द्विगुणीत करेल पालक कबाबची रेसिपी, घरी बनवणे आहे खूप सोपे

Palak Kebab: चहाची मजा द्विगुणीत करेल पालक कबाबची रेसिपी, घरी बनवणे आहे खूप सोपे

Sep 08, 2024 07:06 PM IST

Tea Time Snacks Recipe: संध्याकाळी चहासोबत काहीतरी चटपटीत खायचे असेल तर तुम्ही पालक कबाबची रेसिपी ट्राय करू शकता. हे बनवणे खूप सोपे आहे.

tea time snacks- पालक कबाबची रेसिपी
tea time snacks- पालक कबाबची रेसिपी (freepik)

Palak Kebab Recipe: संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये गरमा गरम चहासोबत काहीतरी चटपटीत खायला सर्वांनाच आवडते. पण रोज काय बनवायचे हा महिलांसमोर मोठा प्रश्न असतो. तुम्ही सुद्धा टी टाइम स्नॅक्ससाठी काही शोधत असाल तर ही रेसिपी तुमच्यासाठी परफेक्ट आहे. तुम्ही कमी वेळेत झटपट पालक कबाब बनवू शकता. ही रेसिपी खायला जेवढी टेस्टी आहे तेवढीच बनवायला सुद्धा सोपी आहे. विशेष म्हणजे मोठ्यांप्रमाणेच लहान मुलांना देखील हे खायला आवडेल. चला तर मग वाट कसली पाहताय जाणून घ्या पालक कबाबची रेसिपी.

पालक कबाब बनवण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे-

- पालक

- कोथिंबीर

- बेसन

- दही

- काजू

- जिरे पावडर

- ओवा

- हिंग

- तेल

- मीठ

पालक कबाब बनवण्याची रेसिपी

पालक कबाब बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये कापलेले आणि भाजलेले काजू घ्या. त्यात जिरे पावडर, हिंग आणि कोथिंबीर टाकून मिक्स करा. तुमचे स्टफिंग तयार आहे. आता एका पॅनमध्ये थोडे तेल गरम करा. त्यात हिंग, जिरे आणि ओवा टाका. आता यात चिरलेले पालक टाकून काही मिनीटे शिजू द्या. पालक शिजल्यानंतर एका ब्लाऊलमध्ये काढून घ्या. आता पालकमध्ये दोन चमचे दही, बेसन आणि चवीनुसार मीठ टाका. सर्व नीट मिक्स करून घ्या. नंतर यातील थोडे मिश्रण हातावर घेऊन याचा गोळा बनवा. हे आता हाताने हलके दावा आणि त्यात मधोमध तयार केलेले स्टफिंग ठेवा. आता हे पुन्हा नीट गोल करून घ्या. याला थोडे चापट करत कबाबचा आकार द्या. कबाब खूप जास्त चपटे करू नका, अन्यथा त्यातील स्टफिंग बाहेर निघेल. अशाच पद्धतीने सर्व कबाब तयार करून घ्या.

आता एका पॅन मध्ये थोडे तेल घेऊन गरम करा. नंतर त्यात कबाब ठेवून ते शॅलो फ्राय करून घ्या. दोन्ही बाजूंनी छान गोल्डन ब्राऊन रंग आल्यावर ते काढून घ्या. तुमचे टेस्टी पालक कबाब तयार आहे. गरमा गरम चहा, हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करा.

Whats_app_banner