Orange Kheer Recipe: आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे. नवीन वर्षाची गोड सुरुवात करण्याचा विचार करत असाल तर काहीतरी स्वीट बनवा. नेहमीचे गोड पदार्थ न बनवता तुम्ही संत्र्याची खीर बनवू शकता. खीर अनेक प्रकारे बनवली जाते. तुम्ही भात, मखना आणि ड्रायफ्रुट्सची खीर अनेकदा खाल्ली असेल. पण तुम्ही कधी संत्र्याची खीर खाल्ली आहे का? ही रेसिपी बनवून पाहा. घरच्या घरी टेस्टी संत्र्याची खीर कशी बनवायची ते जाणून घ्या.
- ५०० ग्रॅम संत्री
- १ लिटर दूध
- १०० ग्रॅम साखर
- १०० ग्रॅम मिल्क मेड
- १०० ग्रॅम ड्रायफ्रुट्स
- थोडेसे केशर
- थोडी वेलची पावडर
संत्र्याची खीर बनवण्यासाठी सर्वप्रथम दूध अर्धे होईपर्यंत उकळवा. या दरम्यान संत्रा सोलून त्याचे गर काढा. दूध अर्धे झाल्यावर त्यात मिल्क मेड आणि मावा घालून दोन मिनिटे उकळवा. आता त्यात केशर, साखर आणि वेलची पूड टाका. चांगले मिक्स करा आणि गॅस बंद करा. आता हे थंड होऊ द्या. पूर्ण थंड झाल्यावर त्यात संत्र्याचा गर घालून मिक्स करा. तुमची टेस्टी संत्र्याची खीर तयार आहे.
संत्रे म्हटले की पहिली गोष्ट डोळ्यासमोर येते ती म्हणजे व्हिटॅमिन सी. संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. व्हिटॅमिन सी रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. मजबूत प्रतिकारशक्ती शरीराला अनेक संक्रमणांपासून वाचवण्यात मदत करू शकते. संत्र्यामध्ये प्रथिने, कार्बोहायड्रेट, फॅट, पाणी, फायबर, एनर्जी, सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, तांबे, मॅंगनीज आणि जस्त यांसारखे इतर पोषक घटक असतात जे शरीराला अनेक फायदे देतात.