मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Onion Pickle Recipe: नेहमीच्या लोणच्यांपेक्षा ट्राय करा कांद्याचं लोणचं! नोट करा सोपी रेसिपी

Onion Pickle Recipe: नेहमीच्या लोणच्यांपेक्षा ट्राय करा कांद्याचं लोणचं! नोट करा सोपी रेसिपी

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Oct 06, 2022 10:57 AM IST

Onion Pickle Recipe in Marathi: हे लोणचं किचनमध्ये उपलब्ध असलेल्या कमी साहित्यांच्या माध्यमातून अगदी सहज तयार करता येते.

कांद्याचे लोणचं
कांद्याचे लोणचं

तुम्ही आजपर्यंत जेवणासोबत सॅलडमध्ये कांदा खाल्ला असेल, पण तुम्हाला माहित आहे का की कांद्यापासून मसालेदार लोणचेही बनवता येते. हे लोणचे फक्त खायला खूप चविष्ट लागतेच पण ते बनवायलाही सोपे आहेत. हे लोणचं किचनमध्ये उपलब्ध असलेल्या कमी साहित्यांच्या माध्यमातून अगदी सहज तयार करता येते. चला तर मग विलंब न लावता जाणून घेऊया हे चविष्ट कांद्याचे लोणचं.

कांद्याचे लोणचं बनवण्यासाठी लागणारे साहित्य

१ किलो - लहान कांदे

१० टीस्पून मोहरी पावडर

३ टीस्पून लाल मिरची पावडर

२ टीस्पून हळद पावडर

२ लिंबाचा रस

४ चमचे आमचूर

५-६ चमचे मीठ

१ १/२ कप तेल

१ टीस्पून काळे मीठ

कांद्याचे लोणचे कसे बनवायचे?

१) कांद्याचे लोणचे बनवण्यासाठी प्रथम कांदा सोलून त्याचे चार तुकडे करावेत.

२) कांद्याना भरपूर मीठ आणि लिंबाच्या रसात चांगले गुंडाळा आणि सुमारे ४ तास बाजूला ठेवा.

३) त्यानंतर स्वच्छ काचेच्या भांड्यात तेल, आमचूर पावडर, तिखट, कांदा, बाकीचे मसाले आणि लिंबाचा रस आणि मीठ टाकून उरलेले तेल वरून टाकावे.

४) आता जार बंद करा आणि सुमारे १२ दिवस बाजूला ठेवा.

५) कांदा सॉफ्ट समजून घ्या की कांद्याचे लोणचे सर्व्ह करायला तयार आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या