Onion Pickle Recipe: भारतीय जेवणात पोळी, भाजी, वरण भात याशिवाय इतरही अनेक पदार्थ दिले जातात. चटणी, पापड, कोशिंबीर आणि लोणचे हे पदार्थ जेवणासोबत दिले जातात. हे जेवणाची चव आणखी वाढवतात. अशा वेळी तुम्हाला नेहमीच्या लोणच्याऐवजी काही नवीन सर्व्ह करायचे असल्यास कांद्याचे लोणचे तयार करा. ही एक नवीन साइड डिश आहे, जी तुम्ही पोळी, पराठ्यासोबत खाऊ शकता. याशिवाय ही वरण भातासोबतच खायला टेस्टी लागते. कांद्याचे लोणचे फ्रिजमध्ये ठेवून काही दिवस साठवू शकता. हे टेस्टी कांद्याचे लोणचे खाऊन सर्व जण तुम्हाला याची रेसिपी विचारतील. हे बनवायला सोपे आणि खायला चविष्ट आहे. चला तर मग जाणून घ्या कसे बनवायचे कांद्याचे लोणचे.
- ४ ते ५ मध्यम आकाराचे चिरलेले कांदे
- अर्धा टीस्पून कलौंजी
- १ टीस्पून बडीशेप
- १/४ टीस्पून हिंग
- १ टेबलस्पून लाल तिखट
- अर्धा टीस्पून हळद
- अर्धा टेबलस्पून धणे पावडर
- १/४ टीस्पून आमचूर पावडर
- चवीनुसार मीठ
- ३-४ चमचे तेल
कांद्याचे लोणचे बनवण्यासाठी एका भांड्यात चिरलेला कांदा, तिखट, हळद, धने पूड, मीठ, आमचूर पावडर घालून हाताने चांगले मिक्स करा. आता एका छोट्या कढईत तेल टाकून चांगले तापू द्या. तेल गरम झाल्यावर त्यात कलौंजी, बडीशेप आणि हिंग घाला. हे चांगले तडतडल्यावर कांद्याच्या मिश्रणात हे गरम तेल घाला. थोडा वेळ ठेवा आणि नंतर सर्व्ह करा.
संबंधित बातम्या