Onion Paratha: नाश्त्यासाठी परफेक्ट आहे कांदा पराठाची रेसिपी, प्रत्येकाला आवडेल चटपटीत चव-how to make onion paratha recipe for breakfast ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Onion Paratha: नाश्त्यासाठी परफेक्ट आहे कांदा पराठाची रेसिपी, प्रत्येकाला आवडेल चटपटीत चव

Onion Paratha: नाश्त्यासाठी परफेक्ट आहे कांदा पराठाची रेसिपी, प्रत्येकाला आवडेल चटपटीत चव

Aug 31, 2024 10:50 PM IST

Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात काही वेगळ खायची इच्छा असेल तर तुम्ही कांदा पराठाची ही रेसिपी ट्राय करू शकता. कांदा पराठा खूप कमी वेळेत तयार होतो.

onion paratha: कांदा पराठाची रेसिपी
onion paratha: कांदा पराठाची रेसिपी (unsplash)

Onion Paratha Recipe: सकाळच्या नाश्त्यात रोज काहीतरी वेगळा पदार्थ बनवणे महिलांसाठी मोठी अडचण असते. तुम्हाला रविवारच्या नाश्त्यासाठी काहीतरी टेस्टी आणि वेगळा पदार्थ बनवायचा असेल तर तु्म्ही कांदा पराठा बनवू शकता. बटाटा, चीज, मुळा, कोबी अशा गोष्टींचे पराठे तुम्ही अनेकदा बनवून खाल्ले असतील, पण कांदा पराठ्याची ही चटपटीत चव तुमच्यासाठी पूर्णपणे नवीन असेल. याशिवाय पराठे बनवण्यासाठी बराच वेळ लागतो, तर कांदा पराठा अगदी कमी वेळात तयार होतो. त्यामुळे पुढच्या वेळी सकाळी कमी वेळ असेल तर तुम्ही ही रेसिपी फॉलो करू शकता आणि अगदी कमी वेळेत चटपटीत कांदा पराठा बनवू शकता. या कांदा पराठ्याची चव लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना खूप आवडेल. चला तर मग जाणून घ्या घरी चटपटीत कांदा पराठा कसा बनवायचा.

कांदा पराठा तयार करण्यासाठी साहित्य

- ४ वाटी पीठ

- ३ कांदे

- १ छोटा तुकडा आले

- २ हिरव्या मिरच्या

- १/२ वाटी कोथिंबीर

- १/२ चमचा ओवा

- १/२ टीस्पून लाल तिखट

- चिमूटभर हळद

- तूप

- चवीनुसार मीठ

कांदा पराठा बनवण्याची पद्धत

चटपटीत कांदा पराठा बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात पीठ चाळून त्यात थोडे मीठ घालून चांगले मळून घ्या आणि थोडा वेळ झाकून ठेवा. यानंतर एका बाऊलमध्ये कांदा लांब पातळ आकारात कापून घ्यावा. चिरलेल्या कांद्यामध्ये लाल तिखट, चाट मसाला, ओवा, आले-लसूण पेस्ट, चिरलेली हिरवी मिरची, चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून सर्व काही चांगले मिक्स करावे. कांद्याचे पराठे बनवण्यासाठी तुमचे कांदा स्टफिंग तयार आहे.

आता मळलेल्या पीठाचा गोळा घेऊन पोळीसारखे लाटून घ्या. आता याच्या मधोमध कांद्याचे स्टफिंग ठेवा आणि सर्व बाजूंनी वरच्या बाजूला बंद करा. गॅसवर तवा गरम होण्यासाठी ठेवा. तवा गरम झाल्यावर त्यात थोडे तूप घालावे. यानंतर पराठा तव्यावर टाकून दोन्ही बाजूंनी नीट भाजून घ्या. तुमचा टेस्टी चटपटीत कांदा पराठा तयार आहे. दही, चटणी किंवा सॉस सोबत गरमागरम सर्व्ह करा.