Onion Naan: पराठा खाऊन कंटाळा आला तर बनवा अनियन नान, टेस्टी आहे ही रेसिपी
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Onion Naan: पराठा खाऊन कंटाळा आला तर बनवा अनियन नान, टेस्टी आहे ही रेसिपी

Onion Naan: पराठा खाऊन कंटाळा आला तर बनवा अनियन नान, टेस्टी आहे ही रेसिपी

Published Jan 16, 2024 08:30 PM IST

Winter Special Recipe: हिवाळ्यात पराठा आवडीने खाल्ले जाते. पण तुम्हाला नेहमीचा आलू पराठा, गोबी पराठा खाण्याचा कंटाळा आला असेल तर तुम्ही अनियन नान बनवू शकता. कांद्याचा टेस्टी नान कसा बनवायचा ते जाणून घ्या.

अनियन नान
अनियन नान

Onion Naan Recipe: हिवाळ्यात अगदी सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत विविध प्रकारचे पराठे आवडीने खाल्ले जातात. पण तुम्हाला नेहमीचे पराठे खाऊन कंटाळा आला असेल आणि काहीतरी वेगळं ट्राय करायचं असेल तर तुम्ही अनियन नान बनवू शकता. दाल मखनीसोबत गरमा गरम कांद्याचे नान खायला खूप टेस्टी लागतात. तुम्ही हे दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात बनवू शकता. अनियन नान खायला चविष्ट तर आहेच पण बनवायलाही खूप सोपे आहे. रेस्टॉरंटसारखे टेस्टी अनियन नान घरी कसे बनवायचे ते जाणून घ्या.

अनियन नान बनवण्यासाठी साहित्य

पिठासाठी

- ४ कप मैदा

- १/४ कप दही

- १/४ कप दूध (पीठ मळण्यासाठी)

- १/२ टीस्पून बेकिंग सोडा

- १ टीस्पून बेकिंग पावडर

- १/२ टीस्पून मीठ

- १ टेबलस्पून साखर

- १ टेबलस्पून तेल

- लोणी किंवा तूप (नानवर लावण्यासाठी)

टॉपिंगसाठी

- १ कप चिरलेला कांदा

- २ चमचे चिरलेली कोथिंबीर

- १/२ टीस्पून लाल तिखट

- १/२ टीस्पून मीठ

- १/२ टीस्पून चाट मसाला

- १/२ टीस्पून कलौंजी (कांद्याच्या बिया)

अनियन नान बनवण्याची पद्धत

सर्वप्रथम अनियन नानचे पीठ तयार करून घ्या. यासाठी प्रथम एका मोठ्या भांड्यात मैदा, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, मीठ, साखर, तेल आणि दही घाला. हे सर्व बोटांनी चांगले मिक्स करा. यानंतर थोडे थोडे दूध घालून मऊ पीठ मळून घ्या. आता एका मोठ्या भांड्यात तेल लावा आणि पीठ भांड्यात ठेवा. ते ओल्या किचन टॉवेलने झाकून ५-६ तास उबदार ठिकाणी ठेवा. आता टॉपिंग बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये कांदा, कोथिंबीर, तिखट, मीठ, चाट मसाला आणि कलौंजी एकत्र करा.

आता नान बनवण्यासाठी मळलेल्या पीठाचे १२ समान भाग करा आणि प्रत्येक भाग गुळगुळीत गोळा करण्यासाठी लाटून घ्या. काळजी घ्या की उरलेले पीठ किचन टॉवेलने झाकून ठेवा, अन्यथा ते कोरडे होईल. आता पीठाचा गोळा घेऊन त्यावर कोरडे पीठ लावून पातळ गोल किंवा ओव्हल नान लाटून घ्या. २ चमचे कांदा टॉपिंग नानवर पसरवा आणि नानमध्ये भरण्यासाठी पुन्हा लाटून घ्या. नान पलटून पुन्हा हलक्या हाताने लाटा. नान शिजवण्यासाठी मोठ्या आचेवर पॅन गरम करा. यानंतर नानच्या साध्या भागावर पाणी लावून गरम तव्यावर ठेवा. नानच्या खालच्या पृष्ठभागावर पाण्यामुळे ते तव्याला चिकटून राहते. 

आता गॅसवर तवा उलटा करा. नानच्या पृष्ठभागावर तपकिरी डाग दिसेपर्यंत ते शिजवा. तवा पुढे-मागे हलवत राहा म्हणजे नान व्यवस्थित शिजेल. पॅन पलटवा आणि २०-३० सेकंद नान शिजवा. तुप किंवा बटरने चांगले ब्रश करा आणि गरम गरम सर्व्ह करा.

Whats_app_banner