मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Onion Chutney: दोन मिनिटात बनवा कांद्याची चटपटीत चटणी, जेवणाची वाढवा चव

Onion Chutney: दोन मिनिटात बनवा कांद्याची चटपटीत चटणी, जेवणाची वाढवा चव

Hiral Shriram Gawande HT Marathi
Dec 30, 2023 01:40 PM IST

Chutney Recipe: दुपारच्या जेवणात चटणी बनवायची असेल पण वेळ नसेल तर ही इंस्टंट कांद्याची चटणीची रेसिपी ट्राय करा. ही चटणी झटपट तयार होते.

कांद्याची चटणी
कांद्याची चटणी

Instant Onion Chutney Recipe: जेवण असो वा नाश्ता त्याची चव वाढवायची असेल तर चटपटीत चटणी बनवा. या चटणीमुळे कोणताही पदार्थ चविष्ट होतो. चटणी फक्त जेवणासोबतच नाही तर नाश्त्यात परांठ्यासोबतही खाल्ली जाते. तुम्हाला दुपारच्या जेवणासाठी चटणी बनवायची असेल पण जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर लगेच कांद्याची ही चटपटीत चटणी तयार करा. याची चव सगळ्यांनाच आवडेल. चला तर मग जाणून घ्या इंस्टंट कांद्याची चटणी कशी बनवायची.

कांद्याची चटणी बनवण्यासाठी साहित्य

- १ कांदा

- २-३ हिरवी मिरची

- कैरीच्या लोणच्याचा मसाला

- चवीनुसार मीठ,

- १ चमचा तूप

कांद्याची चटणी बनवण्याची पद्धत

ही चटपटीत चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम कांदा सोलून स्वच्छ धुवून घ्या. नंतर कांदा चिरुन घ्या. हे खूप बारीक चिरु नका तर याचे तुकडे करा. आता हे तुकडे मिक्सरच्या भांड्यात ठेवा. तसेच यात हिरव्या मिरचीचे तुकडे घाला. प्रत्येक घरात वेगवेगळे लोणचे असते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यात कैरीच्या लोणच्याचा मसाला किंवा मिरचीचे लोणचे घालू शकता. लोणच्याच्या मसाल्यात तेल आणि मीठ यांचे प्रमाण एकदम परफेक्ट असते. जे या चटणीला टेस्टी इंस्टंट लोणच्याची चव देईल. कांद्यामध्ये तुमच्या आवडीच्या लोणच्याचा मसाला मिक्स करा आणि चवीनुसार मीठ घाला. आता हा कांदा मिक्सरच्या भांड्यात दोन ते तीन वेळा थोडा फिरवून घ्या. याची बारीक पेस्ट करु नका. तर थोडे जाडसर राहू द्या. आता याला तडका द्या. 

यासाठी पॅनमध्ये तूप घाला. तुम्हाला तूप आवडत नसेल तर तुम्ही तेल सुद्धा घेऊ शकता. ते गरम झाल्यावर त्यात जाडसर बारीक केलेला कांदा टाका. एक ते दोन मिनिटे मंद आचेवर भाजून घ्या. तुम्ही टेस्टी चटपटीत कांद्याची चटणी तयार आहे.

WhatsApp channel