Oats Tikki Recipe: संध्याकाळच्या चहासोबत काहीतरी चटपटीत खायला सर्वांनाच आवडते. पण अनेकदा स्नॅक्ससाठी टेस्टी आणि हेल्दी ऑप्शन शोधले जातात. तुम्हाला सुद्धा संध्याकाळी काही टेस्टी आणि हेल्दी खायची इच्छा असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे. तुम्ही ओट्सपासून टेस्टी टिक्की बनवू शकता. ओट्स टिक्कीची ही रेसिपी टेस्टी तर आहेच पण बनवायलाही सोपी आहे. चला तर मग जाणून घ्या कशी बनवायची ओट्स टिक्की
- ओट्सचे पीठ
- पनीर
- रताळे
- मिक्स भाज्या
- लाल शिमला मिरची
- कोबी
- कांदा
- बीन्स
- हिरवी मिरची
- आले
- कोथिंबीर
- लिंबू
- लाल तिखट
- हळद
- चाट मसाला
- सैंधव मीठ
- साधे मीठ
ओट्स टिक्की बनवण्यासाठी प्रथम एका भांड्यात पनीर किसून घ्या. आता त्यात उकळलेले आणि मॅश केलेल्या रताळे घाला. त्यात आलं, मीठ, सैंधव मीठ, लाल तिखट, हळद, चाट मसाला, कोथिंबीर आणि लिंबाचा रस घाला. नंतर बारीक चिरलेल्या सर्व भाज्या घाला. तुम्ही यात तुम्हाला आवडतात त्या सर्व भाज्या टाकू शकता. आता हे सर्व चांगले मिक्स करा. आता या मिश्रणाचा थोडासा गोळा घेऊन त्याला चापट आकार देऊन टिक्की तयार करा. आता एक नॉन-स्टिक पॅन गरम करून त्यावर थोडं तेल लावून ते नीट गरम होऊ द्या. तेल गरम झाल्यावर त्यात टिक्की टाका आणि दोन्ही बाजूंनी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्या. तुम्ही ओट्स टिक्की सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.