Oats Pav Recipe: आजकाल बहुतेक लोक हेल्दी फूडकडे वळत आहेत. विशेषतः लोक मैद्याऐवजी इतर हेल्दी पर्याय निवडत आहेत. लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना पावभाजी खायला आवडते. पण भाजीसोबत देण्यात येणारा पाव हा मैद्यापासून बनवलेला असतो. पण तुम्ही घरच्या घरी ओट्सपासून पाव तयार करू शकता. या पावची चव अप्रतिम आहे. चांगली गोष्ट अशी म्हणजे हे तुम्ही साखर किंवा मैदा न वापरता बनवू शकता. चला तर मग जाणून घ्या ओट्सपासून पाव कसे बनवायचे.
- ओट्स
- पीठ
- मध
- बटर
- यीस्ट
- मीठ
ओट्सपासून पाव बनवण्यासाठी प्रथम ओट्स तासभर पाण्यात भिजत ठेवा. नंतर त्याची पेस्ट बनवा. आता सर्व साहित्य मिक्स करा. आता पीठ मऊ आणि लवचिक होईपर्यंत मळून घ्या. नंतर त्यात वितळलेले बटर घाला आणि पीठ शक्य तितके गुळगुळीत करा. आता पीठ १ तास उबदार ठिकाणी ठेवा. आता पीठाचे ६ भाग करून पावाचा आकार द्या. आता ३० मिनिटे बेक करा. चांगले बेक केल्यानंतर सर्व्ह करा.