Protein Rich Dinner Recipe: अनेकदा रात्री हेवी पदार्थ खाऊ वाटतं नाही. काही तरी हलकं खायचं असते. असे पदार्थ पचायला हलके असतात. यासोबतच हे पदार्थ हेल्दी असावेत असेही असते. यःशिवाय तज्ज्ञ आहारात प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश करण्याची शिफारस करतात. कारण यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते, ज्यामुळे वजन कमी होण्यासोबतच ते निरोगी राहण्यास मदत होते. ओट्स हा एक उत्तम पर्याय आहे. बऱ्याच लोकांना ओट्सची चव आणि टेक्शर आवडत नाही. मग याला पर्याय म्हणून अशा परिस्थितीत आज आम्ही तुमच्यासाठी ओट्सपासून बनवलेली रेसिपी घेऊन आलो आहोत, जी काही मिनिटांत तयार होते आणि चवीलाही अप्रतिम असते. या रेसिपीचे नाव आहे ओट्स ऑम्लेट. ते बनवण्याची कृती जाणून घ्या.
२ अंड्याचा पांढरा भाग, बारीक चिरलेले आले, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेली हिरवी मिरची, १/२ पॅकेट मसाला ओट्स, चवीनुसार तेल, मीठ आणि काळी मिरी
> एका भांड्यात अंड्याचा पांढरा, मसाला ओट्स, आले, मिरची, कोथिंबीर, मीठ आणि मिरपूड घालून सर्व साहित्य एकत्र होईपर्यंत चांगले फेटून घ्या.
> नॉन-स्टिक पॅन गरम करण्यासाठी ठेवा. यानंतर त्यावर थोडे तेल लावा. हे मिश्रण एका खोलगट चमच्याने तव्यावर पसरवा. दोन्ही बाजूंनी चांगले शिजवा.
> ओट्स ऑम्लेट काही मिनिटात कसे तयार झाले ते पहा.
> तुम्ही हे ऑम्लेट जसेच्या तसे खाऊ शकता किंवा ब्रेडसोबत त्याचा आनंद घेऊ शकता.
> ज्यांना डायटिंग न करता वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी हा खूप चांगला नाश्ता आहे. तसे, तुम्ही ते कधीही तयार करून खाऊ शकता.
संबंधित बातम्या