Oats Cutlet Recipe: संध्याकाळची भूक भागवण्यासाठी अनेक लोक हलका नाश्ता करतात. स्नॅक्स म्हटले की सहसा कचोरी, समोसा असे पदार्थ येतात. पण नेहमी तळलेले पदार्थ खाणे आरोग्यासाठी चांगले नसते. तुम्हाला स्नॅक्समध्ये काही टेस्टी आणि हेल्दी खायचे असेल तर तुम्ही ओट्स कटलेट बनवू शकता. ही रेसिपी खायला टेस्टी असून बनवायलाही सोपी आहे. विशेष म्हणजे ओट्स आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर म्हटले जाते. त्यामुळे ही रेसिपी टेस्टी आणि हेल्दी आहे. चला तर मग जाणून घ्या कसे बनवायचे ओट्स कटलेट.
- ओट्स फ्लोअर
- पनीर
- कांदा
- कोबी
- बीन्स
- रताळे
- लाल शिमला मिरची
- हिरवी मिरची
- आले
- कोथिंबीर
- लिंबू
- लाल तिखट
- हळद
- चाट मसाला
- सैंधव मीठ
- मीठ
प्रथम एका भांड्यात पनीर किसून घ्या आणि नंतर ते उकळलेले आणि मॅश केलेले रताळे घाला. त्यात आलं, मीठ, सैंधव मीठ, लाल तिखट, हळद, चाट मसाला, कोथिंबीर आणि लिंबाचा रस घाला. सोबत बारीक चिरलेल्या भाज्या घाला. ते चांगले मिक्स करा आणि नंतर त्याचे लहान भाग घेऊन तुमच्या आवडीच्या आकाराच्या टिक्की बनवा. आता एक नॉन-स्टिक पॅन गरम करून त्यावर थोडं तेल लावून गरम होऊ द्या. ते गरम झाल्यावर त्यात टिक्की टाका आणि दोन्ही बाजूंनी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्या. ओट्स टिक्की तयार आहे. पुदिन्याच्या चटणीबरोबर सर्व्ह करा.
संबंधित बातम्या