Nuts Chocolate Recipe: भारतात सणाचे स्वतःचे महत्त्व आहे. यावर्षी रक्षाबंधनाचा सण १९ ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. भाऊ - बहिणीसाठी हा दिवस खूप खास असतो. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते. या दिवशी बहीण आपल्या भावाला खास वाटण्यासाठी खूप काही करते. या निमित्ताने ती आपल्या भावासाठी सुंदर राखी शोधण्यापासून त्याची आवडती मिठाई किंवा गोड पदार्थ बनवण्यापर्यंत बरंच काही करते. त्याचबरोबर बहीण आपल्या भावाला भेटवस्तूही देते. या रक्षाबंधनात जर तुम्हाला तुमच्या भावाला गोड ऐवजी काहीतरी वेगळं द्यायचं असेल तर तुम्ही त्याला स्वत: बनवलेलं चॉकलेट गिफ्ट करू शकता. नट्सपासून बनवलेले चॉकलेट कसे बनवायचे ते येथे जाणून घ्या. हे घरी सहज बनवता येतात. आपण ते आपल्या भावाला गिफ्ट देऊ शकता किंवा त्याचे तोंड गोड करण्यासाठी घरी बनवू शकता. जाणून घ्या नट्स चॉकलेटची रेसिपी
- डार्क चॉकलेट - ३५० ग्रॅम
- काजू - ५० ग्रॅम
- बदाम - ५० ग्रॅम
- मनुका - ५० ग्रॅम
- टुटी फ्रुटी - अर्धा कप
- बटर - १ टीस्पून
- चॉकलेट बनवण्यासाठी मोल्ड
नट्स चॉकलेट बनवण्यासाठी आधी तुम्हाला आवडेल तो साचा घ्या आणि बटरने ग्रीस करा. मग बाजूला ठेवा. आता डबल बॉयलर पद्धतीने चॉकलेट वितळवून घ्या. आपण ते मायक्रोवेव्हमध्ये देखील वितळवू शकता. टॉकलेट वितळल्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीचे सर्व नट्स आणि ड्रायफ्रूट्स कापून घ्या. ते वितळवलेल्या चॉकलेटमध्ये घाला आणि चांगले मिक्स करा. आता हे चॉकलेटचे मिश्रण चमच्याने आपल्या तयार साच्यात भरून १ तास डीप फ्रीजमध्ये ठेवा. नंतर काढून चॉकलेट रॅपिंग पेपरमध्ये गुंडाळा. चॉकलेट एका डब्यात टाकून भावाला भेट द्या. तुम्हाला हवं असेल तर डार्क चॉकलेटऐवजी व्हाईट चॉकलेट सुद्धा वापरू शकता.