Nuts Chocolate Modak Recipe: गणेश चतुर्थीनंतर दहा दिवसांचा गणेशोत्सव सुरू होतो. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेश भक्त बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतात आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पा निरोप घेऊन मूर्तीचे विसर्जन करतात. काही लोकांच्या घरी बाप्पाचा मुक्काम दहा दिवस असतो तर काही लोकांच्या घरी दीड, पाच किंवा सात दिवस मुक्काम असतो. गणेशोत्सवाच्या या दिवसांत बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी विविध प्रकारचा प्रसाद अर्पण केला जातो. त्यातही बाप्पाला मोदक खूप आवडतात, त्यामुळे मोदकाचा प्रसाद नक्कीच अर्पण केला जातो. मोदक वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जाते. तुम्हाला विसर्जनाच्या दिवशी वेगळे मोदक ट्राय करायचे असतील तर तुम्ही बाप्पासाठी चॉकलेट मोदक बनवू शकता. येथे आम्ही नट्स चॉकलेट मोदकाची रेसिपी सांगत आहोत. हा प्रसाद बाप्पासोबत घरातील मुलांना सुद्धा खूप आवडेल. हे बनवायला खूप सोपे आहेत. चला तर मग जाणून घ्या कसे बनवायचे नट्स चॉकलेट मोदक.
- १ कप खवा
- अर्धा कप साखर
- १ टीस्पून वेलची पूड
- २५ ग्रॅम चॉकलेट कंपाऊंड
- २ टीस्पून मनुका
- २ टीस्पून काजू
- २ टीस्पून बदाम
- तूप
हे मोदक बनवण्यासाठी खवा किसून घ्या. नंतर चॉकलेटही किसून घ्या. आता काजू आणि बदामाचे छोटे तुकडे करा. नंतर एका कढईत तूप गरम करून हे चांगले भाजून घ्यावे. आता कढईत खवा भाजून घ्या. भाजल्यावर त्यात चॉकलेट, साखर आणि वेलची पूड घाला. शिजल्यावर हे थंड करा. नंतर हे मिश्रण हाताने मॅश करा. आता लहान समान आकाराचे गोल तुकडे घ्या. आता हे गोळे मोदकाच्या साच्यात घालून त्यात भाजलेले नट्स आणि मनुका घाला. नीट दाबून मग बाहेर काढा. मोदकाच्या स्वरूपात चमक हवी असेल तर आधी साच्याला तूपाने ग्रीस करा.
जर तुम्ही साखर टाळत असाल तर तुम्ही त्यात गूळ किंवा खजूर घालू शकता. तुमचे नट्स चॉकलेट मोदक तयार आहेत.