Skin Care: घरी नाईट क्रीम कशी बनवायची? जाणून घ्या खास DIY रेसिपी
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Skin Care: घरी नाईट क्रीम कशी बनवायची? जाणून घ्या खास DIY रेसिपी

Skin Care: घरी नाईट क्रीम कशी बनवायची? जाणून घ्या खास DIY रेसिपी

Mar 03, 2024 03:40 PM IST

DIY Night Cream: त्वचेचे पोषण आणि पोत सुधारण्यासाठी रात्रीच्या वेळी स्किन केअर करणे गरजेचे आहे. नाईट क्रीमचा वापर केल्याने त्वचेचा पोत सुधारण्यासाठी फारच उपयुक्त ठरते.

How to make night cream
How to make night cream (Freepik)

Night Skin Care: रात्री स्किन आपली चांगला श्वास घेते. यामुळे रात्रीचे स्किन केअर फार महत्त्वाचे आहे. नाईट क्रीम वापरणे करणे गरजेचे आहे. ही क्रीम त्वचेचे पोषण आणि ओलावा टिकवण्यासाठी वापरतात. सुरकुत्या कमी करण्यासाठी आणि त्वचेचा पोत सुधारण्यासाठी फार उपयुक्त आहे. याशिवाय नाईट क्रीममुळे दिवसभर त्वचेवर लावल्या जाणाऱ्या सौंदर्य प्रॉडक्ट्सवरचा प्रभावही कमी होतो. यामुळे त्वचेचा पोत सुधारतो. ही क्रीम त्वचेचे छिद्र उघडते आणि आतून पोषण करते. याशिवाय नाईट क्रीम लावण्याचे अनेक फायदे आहेत. सर्वप्रथम ही क्रीम बनवण्याची पद्धत आणि त्याची खास रेसिपी जाणून घेऊया.

Glowing Face Home Remedies: या सोप्या फॉर्मुलाचा करा अवलंब, येईल चेहऱ्यावर चमक!

कशी बनवायची क्रीम?

घरी नाईट क्रीम बनवण्यासाठी तुम्हाला फक्त एलोवेरा जेल, केशर आणि व्हिटॅमिन ई घ्यावं लागेल. तर, तुम्हाला काय करायचे आहे ते जाणून घ्या.

- एलोवेरा जेल एका छोट्या डब्यात काढा.

- त्यात थोडे केशर आणि खोबरेल तेल घाला.

- नंतर त्यात थोडेसे व्हिटॅमिन ई घाला.

- सर्वकाही चांगले मिसळा. नंतर थोडं गुलाबजल टाका.

- सर्वकाही मिसळा आणि बॉक्स बंद ठेवा.

Home Remedies on Rashes: बर्फापासून ते क्रीमपर्यंत, जाणून घ्या त्वचेवर पुरळ, रॅशेस उठल्यावर काय लावायचे?

कशी वापरायची क्रीम?

रात्री झोपण्यापूर्वी ते चेहऱ्यावर लावायचे आहे. हलक्या हातांनी मसाज करा. मग झोपायला जा. अशाप्रकारे रोज रात्री नाईट क्रीम लावल्याने त्वचेतील पिगमेंटेशनसह अनेक समस्या दूर होऊ शकतात. याशिवाय, ते सुरकुत्या, बारीक रेषा कमी करते आणि तुमच्या त्वचेला टोनिंग करण्यास मदत करते. अशा प्रकारे घरी नाईट क्रीम बनवा आणि चेहऱ्यावर लावा.

Winter Skin Care: चेहऱ्यावर दररोज मॉइश्चरायझर लावल्यास काय होते? जाणून घ्या

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner