Tips To Make New Friends: अनेक लोकांना नवीन ठिकाणी जाणे आणि नंतर नवीन लोकांना भेटणे, आणि मैत्री करणे कठीण जाते. इंट्रोवर्ट लोकांना सहसा या समस्येचा सामना करावा लागतो की ते नवीन लोकांना भेटू शकत नाहीत आणि संवाद सुरू करू शकत नाहीत. अशा परिस्थितीत त्यांना जास्तीत जास्त वेळ एकट्यानेच घालवावा लागतो. पण नवीन मित्र बनवणे किंवा लोकांना भेटणे इतके अवघड नाही. फक्त काही गोष्टी लक्षात ठेवून नवीन मित्र सहज बनवता येतात. नवीन मित्र बनवण्यासाठी तुम्हाला स्वतःला काही सवयी लावून घ्याव्या लागतील. जाणून घ्या नवीन मित्र बनवण्यासाठी कोणत्या टिप्स फॉलो कराव्या.
अशा लोकांसोबत बोलायला सुरु करा ज्यांच्यासोबत तुम्ही कंफर्टेबल फिल करता. ज्यांच्यासोबत तुम्हाला थोडे बरे वाटते त्यांच्याशी बोला. लहान स्टेप उचला आणि थोडे बोला. आय कॉन्टॅक्ट ठेवून बोला. यामुळे तुम्हाला आत्मविश्वास मिळेल. तसेच अशा लोकांना पुन्हा भेटण्याचे व त्यांच्याशी बोलण्याचे वचन द्या. जेणेकरून तुम्ही एकत्र अधिकाधिक कंफर्टेबल होऊ शकता.
एखाद्याशी बोलताना तुम्हाला नर्व्हस वाटत असेल तर ग्रुपमध्ये सहभागी व्हा. ग्रुप अॅक्टिव्हिटीमध्ये थोडेसे संभाषण वाढवू शकता. तुमच्या आवडत्या उपक्रमात सहभागी झाल्याने तुम्हाला आत्मविश्वास आणि उत्साह दोन्ही मिळतो. ज्यामुळे तुम्ही तुमची माहिती आणि लाईक्स इतरांसोबत शेअर करू शकता. अशा स्थितीत काय बोलावे, कुठून संभाषण सुरू करावे, अशा प्रश्नांशी झगडावे लागणार नाही.
वाईट अनुभवांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा. असे केल्याने जेव्हाही तुम्ही नवीन लोकांना भेटता तेव्हा त्यांचे चांगले आणि सकारात्मक रिस्पॉन्स लक्षात ठेवा. जेणेकरून भेटणे, बोलणे आणि मैत्री करणे सोपे होईल.
स्वतःमध्ये उणिवा शोधण्याऐवजी आत्मविश्वास टिकवा. अन्यथा, जेव्हाही तुम्ही एखाद्याला भेटण्याचा किंवा मैत्री करण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुमच्या मनात अनेक गोष्टी धावतात आणि काही नकारात्मक मुद्दे बाहेर येऊन तुमचा आत्मविश्वास कमी करतात.
जेव्हा तुम्हाला मैत्री करायची असेल तेव्हा तुमच्या कुटुंबाचा आणि नातेवाईकांचा पाठिंबा घ्या. तुमच्या भावनांबद्दल त्यांच्याशी बोला आणि तुमच्या मनातील नकारात्मक विचार शेअर करा. जेणेकरून ते तुमच्या मनातील दुविधा दूर करू शकतील आणि तुम्ही त्यांच्याशी मोकळेपणाने बोलू शकाल.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)