मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Mango Ice cream Recipe: घरच्या घरी बनवा झटपट आंब्याचं आईस्क्रीम, जाणून घ्या बनवण्याची सोपी पद्धत!

Mango Ice cream Recipe: घरच्या घरी बनवा झटपट आंब्याचं आईस्क्रीम, जाणून घ्या बनवण्याची सोपी पद्धत!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Apr 05, 2024 10:44 AM IST

Summer Ice Cream Recipe: आंब्याचा सिझन आला आहे, त्यामुळे जर तुम्हाला या सिझनमध्ये मँगो आइस्क्रीम खायचा असेल तर घरीच ते बनवू शकता.

 Summer Recipe
Summer Recipe (freepik )

Homemade Natural Mango Ice Cream Recipe: उन्हाळी सीजन येताच आंबे बाजारात दाखल होतात. लोक वर्षभर आंब्याची वाट पाहत असतात. या फळाची चव कोणालाही वेड लावू शकते. या ऋतूमध्ये उष्णता देखील खूप असते. यामुळे लोक नेहमी काहीतरी थंड खाण्याचा विचार करतात. अशा परिस्थितीत या हंगामात उष्णतेवर मात करण्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे आंबा-आईस्क्रीम. आपल्या आवडीच्या फळाला तुम्ही आईस्क्रीमच्या रूपात आपलं आवडतं फळ खायला मिळाला तर किती छान. तुम्हाला अनेक प्रकारचे आंब्याचे फ्लेवरचे आइस्क्रीम मिळत असले तरी या आइस्क्रीममध्ये भेसळ असते जी तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असते. याचमुळे तुम्ही घरच्या घरी आंब्याचं आईस्क्रीम बनवू शकता. चला जाणून घेऊयात रेसिपी. हे आइस्क्रीम बनवण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे आणि त्यासाठी फक्त ४ साहित्यांची आवश्यकता असेल.

लागणारे साहित्य

२-३ आंबे

२ कप लो फॅट कोल्ड क्रीम

७ चमचे साखर (किंवा चवीनुसार जास्त)

National Black Forest Cake Day: घरीच झटपट बनवा ब्लॅक फॉरेस्ट केक, जाणून घ्या रेसिपी!

जाणून घ्या कृती

मँगो आईस्क्रीम बनवण्यासाठी आधी आंबा स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर आंबा सोलून त्याचे तुकडे करा. आंब्याचे काही तुकडे गार्निशसाठी बाजूला ठेवा आणि उरलेल्या आंब्याचा लगदा ब्लेंडरमध्ये टाकून त्याची प्युरी तयार करा. आता ही प्युरी एका मोठ्या भांड्यात काढा. त्यानंतर २ कप लो फॅट कोल्ड क्रीम मिक्सर जारमध्ये टाका आणि मिक्सरमध्ये बारीक करा. हे कोल्ड क्रीम मिक्सरमध्ये मंद गतीने घट्ट होईपर्यंत फेटून घ्या.घट्ट झाल्यावर त्यात साखर आणि थोडे मीठ घाला.

Protein Soup Recipe: नाश्त्यासाठी बनवा हाय प्रोटीन सूप, नोट करा हेल्दी रेसिपी!

आता स्मूथ कंसिस्टेंसी थोडा मिक्सरचा वेग थोडा वाढवा. आता हे मिश्रण आंब्याच्या प्युरीमध्ये घाला. यानंतर हे सर्व साहित्य नीट मिक्स करून घ्या.शेवटच्या टप्प्यात हे मिश्रण एका डब्यात ठेवा आणि त्यावर आंब्याच्या तुकड्यांनी सजवा. आपली इच्छा असल्यास, आपण क्रीम सह तुकडे मिक्स करू शकता. आता, कंटेनर बंद करा आणि सर्व्ह करण्यापूर्वी सुमारे ६ तास किंवा त्याहून अधिक काळ रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून ‘हिंदुस्तान टाइम्स मराठी’ याची पुष्टी करत नाही.)

WhatsApp channel