मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Muskmelon Face Pack: खरबूजपासून बनवा फेस पॅक, टॅनिंग दूर होण्यासोबतच चमकेल चेहरा

Muskmelon Face Pack: खरबूजपासून बनवा फेस पॅक, टॅनिंग दूर होण्यासोबतच चमकेल चेहरा

May 29, 2024 11:40 AM IST

De-Tan Face Pack: त्वचा चमकदार दिसण्यासाठी स्त्रिया वेगवेगळ्या प्रकारच्या स्किन केअर प्रोडक्ट वापरतात. अशा परिस्थितीत फळांपासून घरच्या घरी फेस पॅक बनवता येतो. खरबूजापासून फेस पॅक कसा बनवायचा ते जाणून घ्या.

टॅनिंग दूर करण्यासाठी खरबूजचे फेस पॅक
टॅनिंग दूर करण्यासाठी खरबूजचे फेस पॅक

Muskmelon Face Pack To Remove Tanning: स्वच्छ आणि चमकदार त्वचेसाठी महिला अनेक प्रकारची ब्युटी प्रोडक्ट वापरतात. याशिवाय ती महिन्यातून एक किंवा दोनदा पार्लरला सुद्धा जाते. पण तिला हवे तसे परिणाम मिळत नाहीत. खरं तर, चमकदार त्वचेसाठी पोषण आवश्यक आहे. अशा परिस्थितीत रासायनिक ब्युटी प्रोडक्ट वापरणे टाळा आणि घरगुती वस्तू वापरा. आपण घरच्या घरी विविध फळांपासून फेस पॅक बनवू शकतो, जे त्वचेसाठी सुद्धा खूप फायदेशीर असतात. येथे आम्ही तुम्हाला खरबूजापासून डी-टॅन फेस पॅक कसा बनवायचा ते सांगत आहोत. हा फेस पॅक उन्हाने काळी झालेली त्वचा पुन्हा गोरी करू शकतो. हा फेस पॅक फळांपासून बनवला जात असल्याने, यामुळे त्वचाही चमकदार होऊ शकते. खरबूज डी-टॅन फेस पॅक कसा तयार करायचा ते जाणून घ्या-

ट्रेंडिंग न्यूज

कसा बनवायचा खरबूजपासून फेस पॅक

खरबूज फेस पॅक बनवण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे -

- खरबूज

- हळद

- मध

- दही

- लिंबाचा रस

फेस पॅक कसा बनवायचा

फेस पॅक बनवण्यासाठी खरबूज नीट धुवा आणि नंतर सोलून कापून घ्या. आता मिक्सरमध्ये खरबूजचे तुकडे टाकून त्याची पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट एका भांड्यात काढा आणि नंतर त्यात हळद, मध, दही आणि थोडेसे लिंबाचा रस मिक्स करा. तुमचा फेस पॅक तयार आहे.

कसा लावावा फेस पॅक

हा फेस पॅक लावण्यासाठी आधी चेहरा धुवा आणि नंतर हा फेस पॅक थोडासा ओल्या चेहऱ्यावर लावा. नंतर साधारण २० ते २५ मिनिटे राहू द्या. ठराविक वेळेनंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. आता तुमचे आवडते मॉइश्चरायझर लावा किंवा तुम्ही लाइट फेस सीरम देखील लावू शकता. चांगल्या परिणामांसाठी हा पॅक आठवड्यातून किमान ३ वेळा वापरा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel