मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Bread Recipe: चहा आणि कॉफीसोबत सर्व्ह करा मल्टीग्रेन ब्रेड, घरी बनवणे आहे सोपे

Bread Recipe: चहा आणि कॉफीसोबत सर्व्ह करा मल्टीग्रेन ब्रेड, घरी बनवणे आहे सोपे

Hiral Shriram Gawande HT Marathi
Feb 05, 2023 05:38 PM IST

संध्याकाळचा चहा असो वा ब्रेकफास्ट, चहा आणि कॉफीसोबत ब्रेड, ब्रिस्टिक खायला सगळ्यांनाच आवडतात. तुम्हाला सुद्धा आवडत असेल तर यावेळी बनवा मल्टीग्रेन ब्रेड. पहा ही सोपी रेसिपी.

मल्टीग्रेन ब्रेड
मल्टीग्रेन ब्रेड

Multigrain Bread Recipe: चहा आणि कॉफीसोबत ब्रेड खायला चांगले लागते. त्यातही ब्रेड मल्टीग्रेन असेल तर ते टेस्टसोबत हेल्थही देते. तुम्ही सोप्या पद्धतीने घरच्या घरी मल्टीग्रेन ब्रेड बनवू शकता. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही रेसिपी लवकर तयार होते. तुम्ही मल्टीग्रेन ब्रेडमध्ये ८ ते १० दिवस देखील ठेवू शकता. पण लक्षात ठेवा की ते एअरटाइट कंटेनरमध्ये ठेवावे लागेल आणि त्यात पाणी गेले नाही पाहिजे. पाण्याचा एक थेंब देखील ब्रेडमध्ये बुरशी आणू शकतो. चला तर जाणून घेऊया मल्टीग्रेन ब्रेडची रेसिपी.

मल्टीग्रेन ब्रेड बनवण्यासाठी साहित्य

- मल्टीग्रेन पीठ

- तीळ

- जवस

- भोपळ्याच्या बीया

- खसखस

- सूर्यफूलाच्या बिया

- ऑलिव्ह ऑइल

- यीस्ट

- ब्राउन शुगर

- मीठ

मल्टीग्रेन ब्रेड बनवण्याची पद्धत

मल्टीग्रेन ब्रेड बनवण्यासाठी प्रथम एका मोठ्या भांड्यात मल्टीग्रेन पीठ, २ चमचे तीळ, २ चमचे जवस, २ चमचे भोपळ्याच्या बिया, २ चमचे खसखस, २ चमचे सूर्यफूल बिया आणि ४ चमचे ऑलिव्ह ऑइल घाला. हे चांगले मिक्स करा. आता एका वेगळ्या भांड्यात कोमट पाण्यात यीस्ट मिसळा. काही मिनिटांतच पाणी क्रीमी झाले पाहिजे. आता हे पाणी पिठाच्या भांड्यात टाका. मीठ, ब्राऊन शुगर घाला आणि सर्व काही चांगले मिक्स करा. पीठ मळून झाल्यावर त्यावर ऑलिव्ह ऑइल लावून चांगले कोट करा. पीठ २० मिनिटे मुरण्यासाठी बाजूला ठेवा. आता ओव्हन प्रीहीट करून बिया एका बेकिंग ट्रेमध्ये पसरवून त्यावर पीठ टाका आणि दाबा. बटर लावून स्मूथ करुन घ्या. त्यावर भिजवलेल्या बिया टाका. ओव्हन २५० डिग्री सेल्सियस वर प्रीहीट करा. २० मिनिटे बेक करावे आणि थंड झाल्यावर चहा किंवा कॉफी बरोबर सर्व्ह करा.

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या