Motichoor Rolls Recipe: जर तुम्हाला गोड खाण्याची आवड असेल आणि जेवण खाल्ल्यानंतर नक्कीच गोड खात असाल तर तुम्हाला ही टेस्टी डेझर्ट रेसिपी नक्कीच आवडेल. मोतीचूर रोल्स ही एक टेस्टी फ्यूजन स्वीट रेसिपी आहे, जी स्प्रिंग रोल शीटमध्ये बुंदी गुंडाळून तयार केली जाते. घरी येणाऱ्या पाहुण्यांचे तोंड गोड करण्यासाठी तुम्ही ही गोड रेसिपी सर्व्ह करू शकता. मोतीचूर रोल्सची खास गोष्ट म्हणजे हे बनवायला इतर मिठाईंप्रमाणे फारसा वेळ लागत नाही. ही रेसिपी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप आवडेल. चला तर मग वाट कसली पाहताय जाणून घ्या कसे बनवायचे मोतीचूर रोल्स.
- १ टेबलस्पून मैदा
- २५० ग्रॅम मोतीचूर लाडू
- ८ मोठे स्प्रिंग रोल शीट
- तळण्यासाठी तूप
मोतीचूर रोल बनवण्यासाठी आधी स्प्रिंग रोल शीट थोडा वेळ बाहेर काढून ठेवा. शीट चिकटवण्यासाठी पीठाची पेस्ट तयार करा. यासाठी १/४ कप पाण्यात पीठ मिक्स करून घ्या. आता बाजारातून मागवलेले मोतीचूरचे लाडू फोडून बुंडी वेगळी करा. आता सपाट पृष्ठभागावर स्प्रिंग रोल शीट ठेवा आणि त्याच्या कडांवर पिठाची पेस्ट लावा. आता स्प्रिंग रोल शीटच्या वर २ टेबलस्पून बूंदी ठेवून शीट रोल करा आणि शीटच्या कडा पिठाच्या पेस्टने चांगल्या प्रकारे सील करा. उर्वरित स्प्रिंग रोल शीटवर ओले कापड ठेवा जेणेकरून ते कोरडे होऊ नयेत. याप्रमाणे सर्व रोल तयार करा. आता मध्यम आचेवर कढईत २ कप तूप गरम करा. या तूपात सर्व रोल्स टाका आणि हलके तपकिरी होईपर्यंत चांगले तळून घ्या. तळल्यावर ते एका प्लेटमध्ये काढून घ्या. तुमचे मोतीचूरचे रोल्स तयार आहेत. त्यावर रबडी आणि व्हॅनिला आईस्क्रीम घालून सर्व्ह करा.
ही रेसिपी झटपट तयार करायची असेल तर स्प्रिंग रोल शीट, मोतीचूरचे लाडू आणि तूप घरी बनवण्याऐवजी बाजारातून खरेदी करा. तसेच, मोतीचूर रोल तयार करण्यासाठी स्प्रिंग रोल शीटच्या आत मोकळी कोरडी बुंदी नेहमीच भरली जाते हे लक्षात ठेवा. त्यामुळे बाजारातून बूंडी खरेदी करताना याची विशेष काळजी घ्या.
संबंधित बातम्या