Moong Dal Paneer Pakoda Recipe: तुम्ही पनीर पकोडे अनेकदा बनवून खाल्ले असतील. पण यावेळी पनीर पकोड्यांना फक्त टेस्टीच नाही तर आरोग्यदायी ट्विस्टही द्या. हे खाल्ल्यानंतर तुम्ही सामान्य पनीर पकोडे बनवणे बंद कराल. मूग डाळ आणि पनीरचे पकोडे टेस्टी लागतात. संध्याकाळच्या चहासोबत खाण्यासाठी हे परफेक्ट स्नॅक्स आहे. जाणून घ्या हे कसे बनवायचे.
- एक कप मूग डाळ (साल नसलेली)
- एक कप मूग डाळ (साल असलेली)
- १०० ग्रॅम पनीर
- ४-५ पाकळ्या लसूण
- एक इंच आल्याचा तुकडा
- दोन हिरव्या मिरच्या
- बारीक चिरलेली हिरवी मेथी
- बारीक चिरलेले पालक
- बारीक चिरलेले हिरवा कांदा
- किसलेला एक गाजर
- किसलेले बटाटे
- तिखट
- धनेपावडर
- बडीशेप पावडर
- दोन चमचे तेल
- दोन चमचे ओव
- चवीनुसार मीठ
हिरवी मूग डाळ आणि साधी मूग डाळ समान प्रमाणात घ्या आणि भिजवा. सुमारे ४-५ तास भिजवल्यानंतर ते चांगले धुवा आणि स्वच्छ करा. मग ही डाळ मिक्सरच्या भांड्यात टाकून त्यात हिरवी मिरची, लसूण पाकळ्या आणि आल्याचा तुकडा घालून बारीक करा. आता ही पेस्ट एका भांड्यात काढा आणि भाज्या मिक्स करा. भाज्यांमध्ये हिरवी मेथी बारीक चिरून, पालक बारीक चिरून मिक्स करावे. याशिवाय किसलेले बटाटे आणि गाजर मिक्स करावे. हिरवा कांदा देखील बारीक करून मिक्स करा. आता सर्व मसाले एकत्र मिक्स करा. यात धणे पावडर, तिखट, ओवा आणि बडीशेप पावडर मिक्स करा. चवीनुसार मीठ घाला. पिठात दोन चमचे गरम तेल घालून चांगले मिक्स करा. आता पनीरचे चौकोनी तुकडे घ्या आणि त्यात चाट मसाला शिंपडा. साधारण अर्धा तास ठेवल्यावर हे तुकडे बॅटरमध्ये टाकून मूग पीठ नीट कोट करून गरम तेलात मंद आचेवर तळून घ्या. जेणेकरून सर्व पकोडे आतून शिजून कुरकुरीत होतील. तुमचे मूग डाळ पनीर पकोडे तयार आहे. गरमा गरम चहा, हिरवी चटणी किंवा सॉससोबत सर्व्ह करा.