Holi Recipe: मूग डाळीपासून बनवा रसरशीत मालपुआ, होळीला ट्राय करा ही रेसिपी
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Holi Recipe: मूग डाळीपासून बनवा रसरशीत मालपुआ, होळीला ट्राय करा ही रेसिपी

Holi Recipe: मूग डाळीपासून बनवा रसरशीत मालपुआ, होळीला ट्राय करा ही रेसिपी

Mar 18, 2024 08:01 PM IST

Recipe for Holi: जर तुम्हाला होळीच्या दिवशी कुटुंबीयांसाठी आणि पाहुण्यांसाठी काही गोड पदार्थ बनवायचा असेल तर तुम्ही मूग डाळीपासून मालपुआ बनवू शकता. हे बनवण्यासाठी फॉलो करा ही रेसिपी.

मूग डाळचा मालपुआ
मूग डाळचा मालपुआ (freepik)

Moong Dal Malpua Recipe: होळीचा सण गुजिया शिवाय अपूर्ण वाटतो. पण गुजियासोबत आणखी एक गोड पदार्थ अनेक ठिकाणी बनवला जातो, तो म्हणजे मालपुआ. जर तुम्हाला मैद्यापासून बनवलेला मालपुआ अनहेल्दी वाटत असेल तर यावेळी तुम्ही मूग डाळीपासून चविष्ट मालपुआ बनवू शकता. पाकात बुडवलेले रसरशीत मालपुआ सर्वांनाच आवडतील. चला तर मग वाट कसली पाहताय जाणून घ्या मूग डाळपासून मालपुआ कसा बनवायचा.

मूग डाळ मालपुआ बनवण्यासाठी साहित्य

- १०० ग्रॅम धुतलेली मूग डाळ

- १/२ कप रवा

- १ ते २ कप दूध

- २ चमचे साखर

- ३-४ वेलची बारीक केलेली

- पाक बनवण्यासाठी दीड कप साखर

- ३ ते ४ वेलचीची पावडर

- १०-१२ केशर धागे

- १ चमचा बेकिंग पावडर

- तळण्यासाठी तेल

मूग डाळ मालपुआ बनवण्याची पद्धत

मूग डाळ मालपुआ बनवण्यासाठी आधी साल नसलेली मूग डाळ नीट धुवून २-३ तास भिजत ठेवा. डाळ फुगल्यावर पाणी गाळून वेगळे करा. आता ही ओली डाळ दूध घालून बारीक करा. डाळ बारीक करण्यासाठी थोडे थोडे दूध घालून पेस्ट तयार करा. आता या मूग डाळीच्या पेस्टमध् येरवा, साखर आणि वेलची पूड घाला आणि चांगले फेटून घ्या. हे पीठ हाताने नीट फेटा आणि ते फुगीर बनवा. फेटताना त्यात आवश्यकतेनुसार दूध घाला. जेणेकरून पेस्ट जास्त घट्ट आणि जास्त पातळ होणार नाही. शेवटी या पेस्टमध्ये एक चमचा बेकिंग पावडर घाला आणि चांगले मिक्स करा. जेणेकरून त्यातील बबल्स निघून जातील. दुसऱ्या बाजूला पॅनमध्ये साखर आणि पाणी घालून पातळ पाक बनवा. त्यात केशरचे धागे आणि वेलची पूड घाला. पाक तयार झाल्यावर गॅस बंद करा. 

आता एका कढईत रिफाइंड तेल गरम करा आणि तयार केलेले पीठ टाकून मालपुआ तयार करा. तळलेला गरमागरम मालपुआ पाकात टाका. जेणेकरून मालपुआमध्ये पाक नीट शोषले जाईल. हे मालपूस थंड करून ड्राय फ्रूट्सच्या कापने सजवा आणि सर्व्ह करा.

Whats_app_banner