मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Mix Veg Recipe: जेवणासाठी झटपट बनवा मिक्स व्हेज, जाणून घ्या रेसिपी!

Mix Veg Recipe: जेवणासाठी झटपट बनवा मिक्स व्हेज, जाणून घ्या रेसिपी!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Jan 08, 2024 10:52 AM IST

Lunch Recipe: रेस्टॉरंट स्टाईलमध्ये मिक्स्ड व्हेज घरी बनवल्यचं असल्यास तुम्हाला फक्त सोपी रेसिपी फॉलो करायची आहे.

how to make mixed veg recipe
how to make mixed veg recipe (freepik )

Dinner Recipe: रोज रोज नेहमीच्या पद्धतीच्या भाज्या खाऊन कंटाळा येतो. आपण नवीन टेस्टच्या शोधात असतो. यातच जर पाहुणे येणार असतील मग तर जेवणासाठी काय बनवावं हा प्रश्न पडतो. नेहमीच उत्तर असते ते म्हणजे पनीरची भाजी. पण यासाठी उत्तम दुसरा पर्याय असतो तो म्हणजे मिक्स भाजी. हिवाळ्याच्या ऋतूत अनेक भाज्या बाजारात येतात. मिक्स व्हेज बनवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या मिसळल्या जातात, ज्यामुळे त्याची चव खूप वाढते. तुम्ही ही रेसिपी ट्राय केल्यास व्हेज बनवल्यास त्याची चव अगदी एखाद्या रेस्टॉरंटसारखीच लागेल. मिक्स व्हेज कसे बनवायचे ते जाणून घ्या.

लागणारे साहित्य

१ कोबी

१ कांदा

२ टोमॅटो

अर्धा कप वाटाणे

अर्धा कप मशरूम

१ गाजर

१/२ कप बीन्स

१ सिमला मिरची

कोरडा मसाला

तेल

चवीनुसार मीठ

१०० ग्रॅम दही

१०० ग्रॅम चीज

मेथीचे दाणे

कशी बनवायची मिक्स व्हेज भाजी?

एका मोठ्या भांड्यात कोबी, मटार आणि बीन्स आणि पाणी घालून ते उकडण्यासाठी ठेवा. आता उरलेल्या भाज्या शिमला मिरची, मशरूम, चीज आणि गाजर चिरून घ्या. आता एका कांद्याचा अर्धा भाग बारीक चिरून घ्या आणि उरलेल्या अर्ध्या कांद्याचे मोठे तुकडे करा. आता गॅस चालू करा आणि तवा गॅसवर ठेवा. कढईत तेल टाका आणि त्यात २ लवंगा, दालचिनीची काडी, १ तमालपत्र आणि १ वेलची घाला. आता अर्धा बारीक चिरलेला कांदा घाला.आता गॅसवरून उकळण्यासाठी ठेवलेल्या भाज्या काढून पाण्यातून बाहेर काढा. कांदा हलका सोनेरी झाल्यावर त्यात सिमला मिरची, मशरूम, चीज, कोबी, मटार आणि बीन्स आणि गाजर घाला.

आता पॅन झाकण ठेवून बाजूला ठेवा. आता २ टोमॅटो चिरून ग्राइंडरमध्ये ठेवा, त्यात १ चमचा लाल तिखट, १ चमचा कोरडी धणे आणि १ चमचा गरम मसाला घाला. आता त्यात १०० ग्रॅम दही आणि चिमूटभर हळद घाला. आता हे सर्व एकत्र बारीक वाटून घ्या. आता भाजी परत एकदा नीट ढवळून घ्या, भाजी हलकी शिजल्यावर त्यात हे मसाले घाला. आता भाजीत चवीनुसार मीठ घाला. भाजी ५ मिनिटे झाकून ठेवा आणि नंतर गॅस बंद करा. तुमची मिक्स व्हेज तयार आहे. त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि मिक्स केल्यानंतर सर्व्ह करा. भाजी गरमागरम रोटीसोबत सर्व्ह करा.

 

WhatsApp channel