Soup Recipe: आपल्या आवडत्या भाज्या मिसळून बनवा टेस्टी सूप, लाइट डिनर करण्यासाठी बेस्ट आहे रेसिपी-how to make mix vegetable soup recipe for dinner ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Soup Recipe: आपल्या आवडत्या भाज्या मिसळून बनवा टेस्टी सूप, लाइट डिनर करण्यासाठी बेस्ट आहे रेसिपी

Soup Recipe: आपल्या आवडत्या भाज्या मिसळून बनवा टेस्टी सूप, लाइट डिनर करण्यासाठी बेस्ट आहे रेसिपी

Sep 25, 2024 08:50 PM IST

Dinner Recipe: जर तुम्हाला व्हेजिटेबल सूपचा आहारात समावेश करायचा असेल तर जाणून घ्या ते घरी कसे बनवायचे. मिक्स व्हेजिटेबल सूप बनविण्याचे सोपी रेसिपी जाणून घ्या.

मिक्स व्हेजिटेबल सूप
मिक्स व्हेजिटेबल सूप (freepik)

Mix Vegetable Soup Recipe: सूप आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते. काही लोकांना जेवणापूर्वी ते प्यायला आवडते. त्याचबरोबर ज्यांना हेल्दी आणि हलके डिनर करायला आवडत असेल त्यांनी सूप प्यावे. मिक्स व्हेजिटेबल सूप हा एक निरोगी पर्याय आहे. जे तुम्ही घरीही सहज बनवू शकता. पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात ते प्यायल्याने शरीराला चांगली उबही मिळते. जर तुम्ही वजन कमी करत असाल तर तुम्ही या सूपचा आहारात समावेश करू शकता. या सूपची रेसिपी खूप सोपी आणि पटकन तयार होते. हे सूप कसे बनवायचे ते येथे जाणून घ्या.

हे व्हेजिटेबल सूप बनवण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे -

- तेल

- लसूण पाकळ्या

- आले

- हिरवा कांदा

- गाजर

- बीन्स

- शिमला मिरची

- कोबी

- मटार

- पाणी

- मीठ

- व्हिनेगर

- मिक्स हर्ब्स

- चिली फ्लेक्स

- काळी मिरी पावडर

- कॉर्न फ्लोर

मिक्स व्हेजिटेबल सूप बनवण्याची रेसिपी

सर्वप्रथम सर्व भाज्या धुवून बारीक चिरून घ्याव्यात. नंतर एका मोठ्या कढईत थोडे तेल गरम करून त्यात ४-५ लसूण पाकळ्या, आले आणि हिरव्या कांदा परतून घ्याव्यात. नंतर त्यात गाजर, बीन्स, शिमला मिरची घालून ढवळत एक मिनिट परतून घ्या. आता त्यात कोबी, मटार, स्वीट कॉर्न घालून हलके परतून घ्या. नंतर त्यात पाणी घालावे. मीठ घालून नीट मिक्स करा. आता हे सूप झाकून भाज्या शिजेपर्यंत उकळून घ्या. मध्ये मध्ये ढवळा आणि तपासा. सूपमधील भाज्या क्रंची असाव्यात, जास्त शिजवलेल्या भाजीची चव चांगली लागणार नाही.

भाज्या शिजत असताना कॉर्न फ्लोअर पाण्यात मिसळून बॅटर तयार करावे. भाज्या शिजल्यावर सूपमध्ये घालून घट्ट होईपर्यंत उकळून घ्या. आता व्हिनेगर, मिक्स हर्ब्स, चिली फ्लेक्स आणि काळी मिरी पावडर घाला. ते चांगले मिक्स करा. नंतर शेवटी हिरवा कांदा घाला आणि सूपचा आनंद घ्या. या सूपमध्ये तुम्ही तुमच्या आवडत्या भाज्यांचा समावेश करू शकता आणि ज्या भाज्या आवडत नाही त्या स्किप करू शकता.

Whats_app_banner