मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Matar Pulao: थंडीच्या दिवसात अप्रतिम लागते मटर पुलावची चव, पाहा ही सोपी रेसिपी

Matar Pulao: थंडीच्या दिवसात अप्रतिम लागते मटर पुलावची चव, पाहा ही सोपी रेसिपी

Hiral Shriram Gawande HT Marathi
Feb 05, 2024 10:27 PM IST

Jain Recipe: हिवाळ्यात गरमा गरम मटर पुलाव खायला खूप टेस्टी लागते. जैन पद्धतीने मटर पुलाव बनवण्यासाठी ही पद्धत फॉलो करा.

मटर पुलाव
मटर पुलाव (freepik)

Matar Pulao Recipe: हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात येणाऱ्या वाटाण्याचे विविध पदार्थ खाल्ले जातात. वाटाण्याची चव अप्रतिम लागते. थंडीमध्ये गरमागरम मटर पुलाव खाण्याचा आनंद वेगळाच असतो. मटर पुलाव हा अतिशय चविष्ट पदार्थ आहे, जे तुम्ही दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी कधीही तयार करून खाऊ शकता. पुलाव बनवण्यासाठी प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करतो. तुम्हाला कांद्याशिवाय जैन पद्धतीने मटर पुलाव बनवायचा असेल तर ही पद्धत फॉलो करा.

मटर पुलाव बनवण्यासाठी आवश्यक साहित्य

- तांदूळ

- टोमॅटो

- काळी वेलची

- छोटी वेलची

- दालचिनी

- तमालपत्र

- जिरे

- लाल तिखट

- हळद

- गरम मसाला

- बिर्याणी मसाला

- कोथिंबीर

- तूप

- हिंग

- मीठ

मटर पुलाव बनवण्याची पद्धत

मटर पुलाव बनवण्यासाठी प्रथम तांदूळ स्वच्छ धुवून पाण्यात भिजवा. आता कुकरमध्ये तूप गरम करून त्यात जिरे टाकून तडतडून घ्या. त्यासोबत मोठी वेलची, छोटी वेलची, हिंग, दालचिनी आणि तमालपत्र टाका. ३० सेकंदांनंतर टोमॅटो घालून चांगले परतून घ्या. तोपर्यंत भिजवलेले तांदूळ गाळून घ्या. टोमॅटो वितळल्यानंतर सर्व मसाले टाका आणि नंतर तांदूळ घाला. चांगले मिक्स करा. नंतर आवश्यकतेनुसार पाणी घाला. लक्षात ठेवा एक वाटी भाताला दोन वाट्या पाणी टाका. जेणेकरून पुलाव मोकळा होईल. आता कुकरचे झाकण ठेवून मध्यम आचेवर एक शिटी घ्या. गॅस बंद करून कुकर थंड होऊ द्या. कुकर उघडल्यानंतर कोथिंबीर घाला आणि गरमागरम सर्व्ह करा.

ही ट्रिक वाढवेल चव 

बहुतेक लोक पुलाव बनवण्यासाठी रिफाइंड किंवा मोहरीचे तेल वापरतात. पण पुलावची चव अप्रतिम हवी असेल तर ते बनवण्यासाठी देसी तूप वापरावे. तुपात बनवलेल्या पुलावचा सुगंध तर अप्रतिम असतोच, पण त्याची चवही अप्रतिम असते.

WhatsApp channel