Viral Green Chutney: घरी काही मिनिटांत बनवा मास्टरशेफ व्हायरल ग्रीन चटणी, नोट करा रेसिपी
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Viral Green Chutney: घरी काही मिनिटांत बनवा मास्टरशेफ व्हायरल ग्रीन चटणी, नोट करा रेसिपी

Viral Green Chutney: घरी काही मिनिटांत बनवा मास्टरशेफ व्हायरल ग्रीन चटणी, नोट करा रेसिपी

Feb 22, 2024 06:15 PM IST

Chutney Recipe: रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेल्यावर सर्व्ह केल्या जाणाऱ्या चटणीची चव अप्रतिम असते. जाणून घ्या मास्टरशेफच्या व्हायरल ग्रीन चटणीची रेसिपी

मास्टरशेफ व्हायरल ग्रीन चटणी
मास्टरशेफ व्हायरल ग्रीन चटणी (freepik)

Masterchef Viral Green Chutney: तुम्ही जेव्हाही रेस्टॉरंटमध्ये जाता तेव्हा सर्वात आधी तुम्हाला सलाद, लोणच्यासोबत हिरवी चटणी दिली जाते. या हिरव्या चटणीची चव अप्रतिम लागते. मात्र जेव्हा ही चटणी घरी बनवली जाते तेव्हा त्याला रेस्टॉरंटसारखी चव नसते. खरं तर रेस्टॉरंटमध्ये ते बनवण्याची वेगळी पद्धत आहे. ही चटणी दही घालून बनवली जाते. अशा चटणीची रेसिपी मास्टरशेफने सांगितली होती. या रेसिपी व्हायरल होत आहेत. चला तर मग जाणून घ्या रेस्टॉरंटमध्ये मिळणाऱ्या हिरव्या चटणीची रेसिपी

चटणी बनवण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे...

- कोथिंबीर

- पुदिना

- हिरवी मिरची

- कांदा

- लसूण

- आले

- लिंबू

- हंग कर्ड

- साखर

- मीठ

हिरवी चटणी बनवण्याची पद्धत

रेस्टॉरंट स्टाईल हिरवी चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम कोथिंबीर आणि पुदिना नीट धुवून घ्या. नंतर ब्लेंडरमध्ये कोथिंबीर आणि पुदिना टाकून त्यात चिरलेला कांदा, दोन तुकडे आले, ५ ते ६ लसूण पाकळ्या, हिरवी मिरची, मीठ आणि साखर घालून चांगले ब्लेंड करा. नीट बारीक करून घ्या आणि मग त्यात हंग कर्ड टाकून पुन्हा एकदा ब्लेंड करा. आता त्यात लिंबाचा रस घाला. तुमची चटणी तयार आहे.

कसे तयार करावे हंग कर्ड

हंग कर्ड घरी बनवण्यासाठी दही घ्या. नंतर एक सुती कापड घेऊन त्यात हे दही बांधा. आता दही काही तास बांधलेले राहू द्या. तुम्ही ते कुठेतरी लटकवू शकता. काही वेळाने दहीतील सर्व पाणी निघून जाईल. मग तुमचे हंग कर्ड तयार होईल.

Whats_app_banner