मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Masala Corn Chaat: नाश्त्यासाठी बनवा मसाला कॉर्न चाट हेल्दी स्नॅक्स! बघा रेसिपीचा व्हिडीओ

Masala Corn Chaat: नाश्त्यासाठी बनवा मसाला कॉर्न चाट हेल्दी स्नॅक्स! बघा रेसिपीचा व्हिडीओ

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Feb 07, 2023 03:12 PM IST

Snacks Recipe: नाश्त्यात निरोगी आणि पौष्टिक काहीतरी खायचे असेल तर मसाला कॉर्न चाट अगदी सोप्या रेसिपीने बनवा. याचे सेवन केल्याने तुमच्या शरीराला भरपूर पोषक तत्वे मिळतील.

मसाला कॉर्न चाट
मसाला कॉर्न चाट (Freepik )

तुम्ही कधीही हेल्दी स्नॅक्सचे सेवन करू शकता. जर तुम्हाला नाश्ता करायचा असेल किंवा संध्याकाळी काही हलके खाण्याची इच्छा असेल तर तुम्ही कोणताही सोपा नाश्ता करून पोट भरू शकता. तुम्ही अनेक गोष्टींपासून स्नॅक्स बनवू शकता. कॉर्न साधारणपणे सर्वांनाच आवडते. तुम्हालाही कॉर्न आवडत असेल तर आम्ही तुम्हाला कॉर्नपासून बनवलेल्या स्नॅक्सची रेसिपी सांगणार आहोत. या रेसिपीचे नाव मसाला कॉर्न चाट आहे. हे बनवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य तुमच्या स्वयंपाकघरात उपलब्ध आहे. मसाला कॉर्न चाटची रेसिपी इन्स्टाग्राम यूजरने (@ds_kitchen_recipes) त्याच्या अकाउंटवर शेअर केली आहे. तुम्हालाही ही रेसिपी ट्राय करायची असेल तर इथे बनवण्याची पद्धत वाचा.

मसाला कॉर्न चाट साठी साहित्य

कॉर्न - १ वाटी

कांदा - १ वाटी

टोमॅटो - १ वाटी

हिरवी मिरची - २ चिरून

मीठ - चवीनुसार

जिरे पावडर - अर्धा टीस्पून

चाट मसाला - अर्धा टीस्पून

लिंबाचा रस - १ टीस्पून

कोथिंबीर - गार्निशसाठी

मसाला कॉर्न चाट रेसिपी

सर्व प्रथम कॉर्न पाण्यात टाकून उकळवा. कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर बारीक चिरून वेगवेगळे ठेवा. आता एका बाऊलमध्ये कॉर्न, कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो, मीठ घालून चांगले मिक्स करा. आता त्यात जिरेपूड, चाट मसाला टाका आणि त्यात लिंबाचा रस पिळून घ्या.हे साहित्य चांगले मिसळा. त्यात चिरलेली कोथिंबीर पण घाला. खाण्यासाठी वेगळ्या भांड्यात सर्व्ह करा.

मसाला कॉर्न चाट आरोग्यासाठी फायदेशीर आहे कारण कॉर्न केवळ आरोग्यासाठीच फायदेशीर नाही तर त्यात समाविष्ट केलेल्या कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, लिंबू देखील आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी असते, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवते. अशा परिस्थितीत जेव्हा जेव्हा तुम्हाला भूक लागते तेव्हा पॅक फूड, जंक फूड खाण्याऐवजी हा आरोग्यदायी नाश्ता बनवा आणि खा.

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या